नाशिक स्थायी समितीतील 'मनसे ट्वीस्ट' मुळे गिरीश महाजन पोहोचले अहमदाबादला

नाशिक महापालिका स्थायी समिती निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनाच धावपळ करावी लागत असून ते नगरसेवकांचा मुक्काम असलेल्या अहमदाबादला धडकले आहेत
Girish Mahajan Reached Ahmedabad to Meet Pary Corporators
Girish Mahajan Reached Ahmedabad to Meet Pary Corporators

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुक येत्या शुक्रवारी होत आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र तरीही नगरसेवकांतील खदखद, नाराजी लपून राहिलेली नाही. त्यातच 'मनसे'चे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज नेला. त्यामुळे गुप्त मतदान असलेल्या या निवडणुकीत 'ट्वीस्ट' आला आहे. त्यातून दगाफटका टाळण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनाच धावपळ करावी लागत असून ते नगरसेवकांचा मुक्काम असलेल्या अहमदाबादला धडकले आहेत.

दरम्यान गिरीश महाजन यांनी काल रात्री भाजपच्या नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा केली. त्यांच्यासमवेत भोजन घेतले. त्यानंतर आज सकाळी ते मुंबीला रवाना झाले. आज सायंकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन उमेदवाराचे नाव निश्‍चित केल्यानंतर त्याला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठींबा द्यावा असे ठरले.

स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपकडे नऊ सदस्यांचा संख्याबळ आहे. मात्र भाजपचे मावळते सभापती उद्धव निमसे यांनी १५७ कोटींचे भुसंपादन प्रस्ताव तसेच अन्य विषयांत भाजयासंदर्भात नेत्यांवर उघड टिका केली होती. पक्षाच्या नेत्यांनी आर्थिक कारणांसाठी आपली कोंडी केली असा आरोप केला होता. यातूनच त्यांनी हंगामी सभापती नियुक्त करतांना भाजप ऐवजी "मनसे'चे मुर्तडक यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांत सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.

विरोधकांकडे सात सदस्य आहेत. यामध्ये राजकीय फिल्डींगचा भाग म्हणून महाविकास आघाडीने उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी स्थायी समितीचे हंगामी सभापती व 'मनसे'चे माजी महापौर मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज नेला. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत काही गडबड झाल्यास भाजपची स्थायी समितीतील सत्ता हातची जाऊ शकते.

ते टाळण्यासाठी काल सायंकांळी गिरीश महाजन स्वतः नगरसेवकांचा मुक्काम असलेल्या अहमदाबादला गेले. त्यांनी नगरसेवकांसमवेत भोजन घेत त्यांचे मत आजमावले. आज सायंकाळी हे नगरसेवक नाशिकला रवाना होतील. त्या दृष्टीने उद्याचा दिवस खुपच महत्वाचा आहे. तेव्हा काय राजकीय घडामोडी होतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com