Girish Mahajan Played Dhol in Nashik Ganesh Immersion Procession | Sarkarnama

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत वाजवला ढोल (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

शहराच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीफळ वाढवून वाकडी बारव येथून प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते आदी उपस्थित होते.

नाशिक  : शहराच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीफळ वाढवून वाकडी बारव येथून प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे,विरोधी पक्ष नेत्या हेमलता पाटील, गजानन शेलार आदी सर्व पक्षी नेते उपस्थित होते. 

मिरवणुकीत २१ मंडळांचा सहभाग आहे. बंदोबस्तासाठी दोन हजार पोलिसांचा ताफा आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, प्रदीप जाधव यांनी बंदोबस्तासाठी नियोजन केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीत ढोल वाजवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख