गिरीश महाजनांना जलसंपदामधून वेळ मिळेना ? 

गिरीश महाजनांना जलसंपदामधून वेळ मिळेना ? 

मुंबई : राज्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उद्‌भवल्यास संशोधन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागावर मोठी जबाबदारी आहे. मात्र या विभागाला सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेने ग्रासले आहे. अतिरिक्त पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करूनही वैद्यकिय पदे रिक्तच असल्याने विभागाचे काम "राम भरोसे"च सुरू आहे.

या विभागाचा कारभार सांभाळणारे मंत्री गिरीश महजनांना राज्याच्या जलसंपदा या "वजनदार" खात्यातून वैद्यकीय शिक्षण या खात्यासाठी वेळ मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे. 

महाजन हे टीम देवेंद्रचे खास शिलेदार आहेत. त्यांची गणना मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये होत असते. त्यासाठी महत्वाचे खाते असलेल्या जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली. त्याचबरोबर महाजनांकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. मात्र मंत्र्यांचे मन मात्र "जलसंपदा' व लाभक्षेत्र विकास विभागातच रमले असल्याचे दिसत आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागातील 650 डॉक्‍टरांची तर प्रशासनातील 300 पदे रिक्त आहेत. या विभागाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना 
वैद्यकीय शिक्षण देणे तसेच विविध रोगांवर औषधोपचार करण्यासाठी संशोधन करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील एकूण महाविद्यालये व रूग्णालयांपैकी महाविद्यालये व रूग्णालयांत डीन ही अति महत्वाची पदे रिक्त आहेत.प्राध्यपकांची एकूण पदांपैकी पदे, तर सहाय्यक प्राध्यापकांची व अन्य अधिव्याख्याताची पदे अद्याप भरलेली नाहीत. 

एकूण मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाच्या मंजूर पदांपैकी पदे भरली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकूण पदांपैकी फक्त पदे भरली असून कार्यालयीन अधिक्षक पदाच्या मंजूर पदांपैकी केवळ पदे भरली गेली आहेत. तर कनिष्ठ व वरीष्ठ लिपिकांची एकूण पदे रिक्त आहेत. 

याबाबत महाजन यांच्याशी संपर्क सांधला असता ते म्हणाले, की वैद्यकिय शिक्षण विभागाच्या रूग्णालये व महाविद्यालयांतील गट अ व गट ब संवर्गातील डॉक्‍टरांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत होती. मात्र याला होणारा विलंब त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाने डॉक्‍टरांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वगळून वैद्यकिय शिक्षण विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. 

वैद्यकिय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयांमध्ये डॉक्‍टर्स व प्रशासकीय पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, हे वास्तव आहे. येत्या महिन्याभरात रिक्त पदे तात्काळ भरली जातील, विश्वास गिरीष महाजन यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com