गिरीश महाजनांनी वशीकरण मंत्राने मुख्यमत्र्यांना वश केलंय:आमदार डॉ.सतीश पाटील 

नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळयात साधूकडून मंत्री गिरीश महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. त्याच मंत्राने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वश केले आहेत. त्यामुळे महाजन सांगतील तेवढेच फडणवीस बोलत असतात.''
 गिरीश महाजनांनी वशीकरण मंत्राने मुख्यमत्र्यांना वश केलंय:आमदार डॉ.सतीश पाटील 

जलगाव : कुंभमेळ्यातील साधूकडून वशीरकरण मंत्राच शिक्षण घेवून राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपनेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना वश केल आहे. त्यामुळेच महाजन सांगतील तेच मुख्यमंत्री फडणवीस बोलत असतात असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एरंडोल पारोळा मतदार संघातील आमदार व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. 

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

राज्यातील नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जात आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज बैठक पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी होते. 

डॉ. पाटील म्हणाले, "" महाजनांनकडे मंत्र असल्याचे सांगितले जात आहे. त्याच मंत्र्याचे आधारे ते चमत्कार करीत असतात अशीही चर्चा आहे. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळयात साधूकडून त्यांनी हा वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. त्याच मंत्राने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वश केले आहेत. त्यामुळे महाजन सांगतील तेवढेच मुख्यमंत्री फडणवीस बोलत असतात.'' 

महाजनांनाकडे मंत्र असेल तर आपल्याकडेही मंत्र आहे, आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यानी एकत्र होवून कार्य करावे या मंत्राने आपल्याला यश मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com