फडणवीस एकाकी पडलेत असे कोणी समजू नका!

फडणवीस एकाकी पडलेत असे कोणी समजू नका!

सरकार बनविण्यसाठी शनिवार (ता.9) पर्यत वेळ आहे. त्या वेळेपर्यंत निश्‍चित युतीचे सरकार येईल व भाजपचाच मुख्यमंत्री होईल.

जळगाव : सरकार बनविण्यसाठी शनिवार (ता.9) पर्यत वेळ आहे. त्या वेळेपर्यंत निश्‍चित युतीचे सरकार येईल व भाजपचाच मुख्यमंत्री होईल असा विश्‍वास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्हयात पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांची पाहणी करण्यासाठी आज दुपारी ते विमानाने तातडीने जळगावला दाखल झाले. त्यांनतर जळगाव तालुक्‍यातील इदगाव डांभूर्णी परिसरात शेतीच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीचा तगादा लावू नये असेही आदेश दिले.

राज्यातील राजकीय स्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, सरकार स्थापनेसाठी शनिवार (ता. 9) पर्यंत वेळ आहे. त्या मुदतीपर्यंत राज्यात सरकार निश्‍चित स्थापन होईल. राज्यात युतीचेच सरकार येईल व भाजपचाच मुख्यमंत्री असेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते संजय राऊत करीत असलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, संजय राऊत बोलत आहेत. आम्ही केवळ ऐकत आहोत. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही केवळ वेट ऍड वॉचची भूमिका घेतली आहे.

राज्यात शासन बनविण्यासाच्या प्रक्रियेत शिवसेना आक्रमक झाली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडले आहेत काय? याला उत्तर देतांना ते म्हणाले, कि मुख्यमंत्री एकाकी नाहीत. आम्ही सर्वच त्यांच्या सोबत आहोत, मात्र आम्ही न बोलण्याचे ठरविलेलेच आहे. त्यामुळे ते एकाकी पडलेत असे कोणीही समजू नये. मात्र काहीही झाले तरी मुख्यमंत्री भाजपचाच होईल असा विश्‍वासही त्यानीं शेवटी व्यक्त केला.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com