उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटलांचा आरोप

भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचा पक्षाचे नेते दावा करीत आहेत. मात्र आमचे नाकारलेले उमेदवार आयात करण्याची मानसिकता भाजपमध्ये दिसून येत आहे. असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना लगावला आहे. उमेदवार चोरीत गिरीश महाजन यांचा हातखंडा असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
Jayant Patil - Girish Mahajan
Jayant Patil - Girish Mahajan

जळगाव : भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचा पक्षाचे नेते दावा करीत आहेत. मात्र आमचे नाकारलेले उमेदवार आयात करण्याची मानसिकता भाजपमध्ये दिसून येत आहे. असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना लगावला आहे. उमेदवार चोरीत गिरीश महाजन यांचा हातखंडा असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

जळगाव येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील म्हणाले, "भारतीय जनता पक्षाचे नेते आपली ताकद मोठी असल्याचा दावा करीत आहेत, मात्र त्यांना उमेदवारही मिळत नाहीत, आमचे नाकारलेले उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देत आहेत. कोल्हापूर येथे युतीची सभा झाली, त्या ठिकाणी पाच जिल्ह्यातून माणसे आणल्यानंतरही गर्दी होत नसल्यामुळे चक्क बेळगाव येथून कानडी श्रोते त्यांना आणावे लागले हीच भाजप-सेनेची शोकांतिका आहे."

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या बाबततीत पाटील म्हणाले, "विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात असे उद्धव ठाकरे म्हणतात. परंतु, आम्ही त्यांना घाबरत नाही, उलट उध्दव ठाकरेच त्यांना घाबरत असतील. उमेदवारी चोरीत गिरीश महाजन यांचा हातखंडा असल्याचा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com