मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे गिरीश महाजनांची पाठ; त्यावर गुलाबराव पाटील काय म्हणाले?

....
girish mahajan
girish mahajan

नाशिक : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात प्रश्न नसतील. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीस आले नाहीत असा टोमणा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यानी महाजन यांना मारला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकला झाली. या बैठकीस माजी मंत्री गिरीश महाजन अनुपस्थित होते. याविषयी विचारले असता, पालकमंत्री पाटील म्हणाले, गिरीश महाजन बैठकीस येतील अशी अपेक्षा होती. मात्र यांच्या मतदारसंघात प्रश्न नसतील त्यामुळे ते आढावा बैठकीला आले नसतील.  तरीही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी येणं आवश्यक होतं.  मात्र सध्या ते 'जाम' नेरचे आहेत असा टोमणा त्यांनी महाजनांना उद्देशून मारला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले,  जळगाव जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न आज मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत.  पद्मालय धरणाला लागणाऱ्या पैशांचा प्रश्न सुटला. जळगाव शहरातील महिला हॉस्पिटलच्या जागेचा आणि इतर गोष्टीच्याअभावाचा प्रश्न देखील सुटला. शहरातील रस्त्यांचा प्रश्न तर संबंधितांशी चर्चा करून जागेवरच सोडण्याचा प्रयत्न झाला. धुळ्याला अनुसूचित जाती-जमातींसाठी वेगळं व्हॅलिडिटी कार्यालय होणार आहे.

आमचे शंभर पैकी पन्नास  प्रश्न जागेवर सुटण्याचा प्रयत्न झालाय.  मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमुळे उत्तर महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळेल. आजच्या बैठकीत बरेच प्रश्न जागेवर सोडवण्याचा प्रयत्न झाला याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com