girish_mahajan_
girish_mahajan_

बॅलेट'वर निवडणूका घेतल्या तरी यश आमचेच :गिरीश महाजन 

..

जळगाव  : '' विरोधी पक्षांची जनतेतील पत पूर्ण संपलेली आहे, त्यांना अपयश समोर दिसते आहे, त्यांना आता कोणतीही कारणे राहिलेली नाहीत. त्यामुळे ते ईव्हीएम मशिनमध्ये घोळ केल्याचा आरोप करीत आहे. निवडणूक आयोगाने 'बॅलेट'पेपरवर मतदानाचा निर्णय घेतला तरी भाजप सेनेच्या यशात आम्ही जाहिर केल्याप्रमाणे अर्धा टक्काही फरक पडणार नाही ,''असा विश्‍वास राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, "  मनसे नेते राज ठाकरे ईव्हीएम विरोधात देशभर दौरे करीत आहेत. बंगाल येथे ते जावून आले.आता सर्व विरोधी पक्ष मिळून आंदोलनही करणार आहेत. मात्र त्यांच्या या सर्व बाष्फळ गप्पा आहेत.जनतेच्या निर्णयाला महत्व आहे, आज जनतेच्या मनातून विरोधी पक्षाची पत पूर्ण संपलेली आहे.''

''आम्ही गेल्या पाच वर्षात केल्या कामामुळे जनता समाधानी आहे, त्यामुळे विधानसभेतही युतीच निवडून येणार आहे. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक आयोगाने 'बॅलेट'पेपरवर मतदान घेतले तरी त्यात अर्धा टक्काही फरक पडणार नाही. याचा आम्हाला विश्‍वास आहे. त्यामुळे विरोधकांनी आता बंगाल, हैदराबादला जाण्यापेक्षा थेट लोकापुढे जावे असा सल्लाही त्यांनी दिला. 

''आपण निवडणूकीत विजयाचे आकडे सांगतो. ते आपण सर्व्हेच्या आधारावर सांगत असतो. विविध एजन्सी तसेच माध्यम सर्व्हे करीत असतात ते जे आकडे सांगतात त्याच आधारावर आपण पक्षाचे एवढे उमेदवार निवडून येतील हे सांगत असतो. लोकसभा निवडणुकीत  राज्यात 40 पेक्षा एकही जागा कमी येणार नाही हे आपण सर्व्हेच्या आधारावर सांगितले होते तेच झाले. त्यामुळे ईव्हीएम मध्ये अफारतफर होते हा विरोधकांचा आरोप खोटा आहे,'' असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com