खडसेंचा आरोप खरा निघाला तर द्याल ती शिक्षा घेणार : गिरीश महाजन

...
girish mahajan
girish mahajan

जळगाव : ``मी आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेचे तिकीट कापले असा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे. मात्र तो संपूर्ण निराधार आहे. त्यांनी याबाबत एक पुरावा द्यावा. जर आमचा दोष असेल तर आम्ही पक्ष देईल शिक्षा घेण्यास तयार आहोत. परंतु कोणताही पुरावा नसतांना आरोप म्हणजे हा तर आमच्यावर अन्यायच आहे,`` असा दावा भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आरोप केला आहे, कि माझे विधानसभेचे तिकीट देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कापले आहे. त्याबाबत बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, खडसे यांना कुणीतरी चुकिची माहिती दिलेली आहे. आमच्या बैठकित त्यांच्याबाबत कोणता विषयही झालेला नाही. केंद्रीय समितीत एकूण अठरा लोक आहेत. त्यांनीच त्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यात आमचा कोणताही संबध नाही. विशेष म्हणजे खडसे यांनाच उमेदवारी नाकारली असे नव्हे तर त्यात बावनकुळे, विनोद तावडे व इतरही हे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील कोणालाही उमेदवारी देण्यात आली नाही, खडसे यांच्या घरातील त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी तरी देण्यात आली. त्यामुळे आम्ही उमेदवारीचे तिकीट कापल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकिचा असल्याचे त्यांनी नंमूद केले.


कोअर कमेटीतील सदस्यांनी आपल्याला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे, असे खडसे म्हणत आहेत. त्यांनी त्याबाबत पुरावा तरी द्यावा. जर त्यांनी पुरावा दिला तर पक्ष देईल ती शिक्षा घेण्यास आपण तयार आहोत. मी याबाबत खडसे यांना भेटणार आहे. त्यांना विचारणार आहे. त्यांनी जाहिरपणे त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला तर त्यांनी माझ्या कानात गुपीतपणे नाव सांगावे. तरीही मी शिक्षा घेण्यास तयार आहे. मात्र कोणताही पुरावा नसतांना आमच्यावर खडसे यांनी आरोप करणे म्हणजे आमच्यावर तो अन्यायच आहे. त्यांच्या मुलीला पाडल्याचा त्यांचा आरोपही निराधारच आहे, त्या मतदारसंघात तीन पक्ष एकत्र झाल्याने त्यांच्या मुलीचा पराभव झाला हे आपण मागेच सांगितले आहे. तरीही त्याबाबतीत आरोप होत असेल तर ते योग्य नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता
जळगाव जिल्हा परिषदेच्या उद्या(ता.3) होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बोलतांना महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे, यापुढेही राहिल. अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com