girish mahajan and puntanmaba | Sarkarnama

पुणतांब्याचे शिष्टमंडळ व "सीएम' भेटीसाठी महाजनांचा पॅरीसहून फोन?

संपत देवगिरे
सोमवार, 26 जून 2017

नाशिक : कर्जमाफीची घोषणा केल्याचे श्रेय अनेक पक्ष, नेते श्रेय घेत आहेत. असाच एक प्रकार केला गेला. पुणतांबे येथील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी म्हणून काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीष महाजन यांनी पॅरीसहून दूरध्वनीद्वारे या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची अपॉईंटमेंट मिळवून दिल्याची चर्चा रंगली आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी उत्सुक नसल्याने उद्या (ता.27) ची ही भेट बारगळल्यात जमा आहे. 

नाशिक : कर्जमाफीची घोषणा केल्याचे श्रेय अनेक पक्ष, नेते श्रेय घेत आहेत. असाच एक प्रकार केला गेला. पुणतांबे येथील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी म्हणून काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीष महाजन यांनी पॅरीसहून दूरध्वनीद्वारे या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची अपॉईंटमेंट मिळवून दिल्याची चर्चा रंगली आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी उत्सुक नसल्याने उद्या (ता.27) ची ही भेट बारगळल्यात जमा आहे. 

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना भेटले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणतांबे गावाला भेट देण्याची शक्‍यता आहे. मात्र त्याआधीच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमार्फत आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे. भाजप मात्र त्यासाठी उत्सुक नसल्याने कर्जमाफीच्या आभारावरुन पुणतांबे गावातच दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. 

कर्जमाफी घोषणेनंतर त्याच्या विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. आता अनेकांचे श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. त्याचा भाग म्हणून शेतकरी संपाची संकल्पना मांडण्यात पुढाकार घेतलेल्या पुणतांबे गावाला विविध नेते भेट देत आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही रविवारी भेट दिली. त्यामुळे डोणगाव (औरंगाबाद) येथील एक कॉंग्रेस कार्यकर्ते, आप पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्जमाफीबद्दल आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पुणतांबे येथील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जाण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. गेले दोन दिवस त्यांचे तसे प्रयत्न आहे. मात्र त्याला स्थानिक भाजपचे पदाधिकारी, गावातील स्थानिक नेते त्याला प्रतिसाद देत नसल्याने हा दौरा बारगळल्यात जमा आहे. 

दरम्यान यासंदर्भात किसान क्रांती मंचचे संदीप गिड्डे आणि पुणतांबे येथील धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधल्यावर, "कर्जमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी मुख्यमंत्री स्वतः पुणतांबे गावाला भेट देण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. तसा "एसएमएस' असल्याने आभारासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे प्रशस्त वाटत नाही असे "सरकारनामा' च्या प्रतिनिधीला सांगितले.

याविषयी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यक दुरध्वनीवर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मंत्री महाजन विदेश दौऱ्यावर आहेत किंवा कसे हे स्पष्ट झाले नाही.

यासंदर्भात पुणतांबे येथील शिष्टमंडळाच्या नावाखाली कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते जाणार होते असेही बोलले जाते. त्यामुळे ज्यांनी ही भेट घेण्यासाठी प्रयत्न करुन भेट मिळवली होती त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख