दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातलय,सरकार युतीचंच येईल : गिरीश महाजन

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातलय ते सर्व बघतायेत त्यामुळे सगळ व्यवस्थित होईल.सरकार महायुतीचे येईल, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्‍वास भाजपचे संकटमोचक व राज्याचे जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी 'सरकारनामाशी'बोलतांना व्यक्त केला.
Girish Mahajan BJP Leader
Girish Mahajan BJP Leader

जळगाव : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातलय ते सर्व बघतायेत त्यामुळे सगळ व्यवस्थित होईल.सरकार महायुतीचे येईल, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्‍वास भाजपचे संकटमोचक व राज्याचे जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी 'सरकारनामाशी'बोलतांना व्यक्त केला.

राज्यातील सरकार स्थापनेबाबत ते म्हणाले, ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून मुंबईत येत आहेत. आता सायंकाळी सहा वाजता आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आता होत आहे, मी त्या बैठकीलाच चाललो आहे. यावेळी मुख्यमंत्री दिल्लीतील स्थितीची माहिती देतील. त्यानंतर पुढील निर्णय होईल. परंतु, आता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. ते सर्व बघाताहेत. त्यामुळे आता सगळ व्यवस्थित होईल. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा होईल. आणि सरकार युतीचेच होईल व मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होईल. लवकरच युती सरकारचा शपथविधी होईल.''

मध्यवधी निवडणुका घेणे सोपे नाही
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना, महाजन म्हणाले, मध्यावधी निवडणूका घेणे सोपे नाही, त्यामुळे पक्षाने तसा कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे त्याची आता कोणतीही शक्‍यताच नाही.''

गिरीश महाजन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com