आजचा वाढदिवस : गिरीश दत्तात्रेय महाजन - जलसंपदा, आरोग्य शिक्षणमंत्री  - girish mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : गिरीश दत्तात्रेय महाजन - जलसंपदा, आरोग्य शिक्षणमंत्री 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 मे 2018

भारतीय जनता पक्षातर्फे जामनेर ( जि.जळगाव ) मतदार संघाचे ते आमदार आहेत. सतत पाचवेळा ते याच मतदार संघातून निवडून येत आहेत. महाजन यांचे वडील दत्तात्रेय महाजन जामनेर येथे प्राथमिक शिक्षक होते. 

भारतीय जनता पक्षातर्फे जामनेर ( जि.जळगाव ) मतदार संघाचे ते आमदार आहेत. सतत पाचवेळा ते याच मतदार संघातून निवडून येत आहेत. महाजन यांचे वडील दत्तात्रेय महाजन जामनेर येथे प्राथमिक शिक्षक होते. 

महाजन यांच्या राजकीय जीवनाची सुरवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली आहे. 1978 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. अभाविप कार्यकर्ते ते
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. 1992 मध्ये ते पहिल्यांदा भारतीय जनता पक्षातर्फे जामनेर ग्रामपंचायत सदस्यपदी
निवडून आले आहेत. याच काळात ते जामनेरचे सरपंच झाले. त्यानंतर 1995 मध्येच ते जामनेर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा आमदार झाले. याच मतदार संघातून सतत पाच वेळा ते निवडून आले आहेत. सन 2014 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. जलसंपदा व आरोग्य शिक्षणमंत्री ही महत्त्वाची खाती त्यांना देण्यात आली. या शिवाय नाशिकचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले. नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याचे त्यांनी शासकीय पातळीवर अत्यंत चांगले नियोजन केले होते. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण, नाशिक येथील शेतकरी मोर्चा यात शासनाच्या वतीने त्यांनी केलेली शिष्टाइस यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मंत्री असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षातर्फेही महाजन यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख