girish mahajan | Sarkarnama

महाजनांना शेतकऱ्यांनी सुनावले खडे बोल

संपत देवगिरे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी दडपशाहीने जमिनींच्या भूसंपादनाच्या प्रश्‍नावरून गेले काही महिने आंदोलन सुरू आहे. आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घ्यायला आलेल्या शेतकऱ्यांना महामार्ग होणारच असे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनीही "जीव देऊ...पण जमिनी नाही' असे खडे बोल सुनावले. त्यामुळे हा प्रश्न मिटण्याची चिन्हे नाहीत. 

समृद्धी महामार्गाच्या मुद्यावरुन शेतकरी आक्रमक असले तरी, शासनही प्रकल्पापासून मागे हटण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आजचा दौरा आंदोलकांच्या घेराव्यात गेला. सायंकाळी त्यांनी, आंदोलकांच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकूनही घेतले. पण त्याचवेळी "समृद्धी महामार्ग राज्याचे चित्र पालटणारा प्रकल्प आहे. त्यामुळे तो होणारच. विरोध असेल तर शेतक-यांशी चर्चा करू असे सांगितले. 

समृद्धी महामार्गासाठी आंदोलकांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाबाबत आज आंदोलकांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यात, फार काही निष्पन्न झाले नाही. अधिकारी गोलमाल करीत आहे. मंत्र्यापर्यत नेमकी स्थिती पोहोचूच देत, नाही. अशीच आंदोलकांची धारणा होती. सायंकाळी पालकमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर आंदोलक ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलतांना, एकवेळ जीव देऊ पण जमिनी नाही. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. त्याविरोधात शहापूर येथे नाशिक व ठाणे जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित आंदोलन करणार आहे. हे स्पष्ट केले. येत्या 26 तारखेला हे आंदोलन होणार आहे. चक्का जाम करीत, आंदोलक शेतकरी विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले. 
पर्यायी मार्गाला नकार ! 
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी झालेल्या चर्चेत चर्चा करु. बघू, बैठक घेऊ असेच उत्तरे दिली. इगतपुरी सिन्नर दरम्यान सध्याच्या घोटी -सिन्नर ऐवजी माळशेज आळे फाटा या पर्यायी मार्गाबाबत त्यांनी कुठलेही आश्‍वासन दिले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख