कार्नाड म्हणाले होते, झुंडशाही सत्तेत आली...

 कार्नाड म्हणाले होते, झुंडशाही सत्तेत आली...

लातूर : देशातील एका गटाला वाटले म्हणून बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर ते सत्तेत आले. याचा अर्थ झुंडशाहीला यश मिळाले, बळ मिळाले असेच आहे, अशा शब्दांत "ज्ञानपीठ'प्राप्त प्रख्यात नाटककार गिरीश कार्नाड यांनी सरकारवर सणसणीत टीका केली होती. त्यांची ही टीका त्यावेळच्या वाजपेयी आणि अडवाणी यांच्या सरकारवर होती. 

नाटक, चित्रपट या माध्यमातून आपली छाप उमटविलेले नाटककार, अभिनेते कार्नाड यांचे सोमवारी (ता.10) निधन झाले. कार्नाड यांच्या शालेय शिक्षणाचा काही भाग पुण्यातच झाला होता. त्यामुळे त्यांचा पुण्याशी घनिष्ठ संबंध होता. म्हणून त्यांची वैचारिक भूमिका वेगवेगळ्या निमित्ताने पुणेकरांनी अनुभवली आहे. बाबरी मशीद प्रकारणापासून वाढत्या असहिष्णुते संदर्भात, गोमांस बंदीपासून चित्रपटावरील राजकीय सेन्सॉरशिपपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर कार्नाड यांनी वेळोवेळी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. 

कर्नाटकात भाजप आणि जेडीएसच्या सरकारने गोहत्या बंदीचा निर्णय घेतला होता. तेंव्हा त्याच्या विरोधात मी आणि यु. आर. अनंतमूर्ती उभा राहिलो. आम्ही हिंदू आहोत, ब्राह्मण आहोत. बीफ न खाणारेही आहोत. जे बीफ खातात त्यांना स्वातंत्र्य आहे. ते तुम्ही कसे हिरावून घेऊ शकता, असा सवाल आम्ही उपस्थित केला होता. प्रत्येकाला स्वताचे 'खाद्य स्वातंत्र्य' आहे, अशी भूमिका कार्नाड यांनी मांडली होती. 

सहिष्णुतेच्या बाबतीत देश मागे चालला आहे. असहिष्णू वातावरण तयार होत आहे. आमच्या भावना दुखावल्या, असे कारण पुढे करत चित्रपटावर बंदी आणा, अशी मागणी करत आहे. हे प्रमाण वाढत आहे. सरकारही या मागण्या मान्य करत आहे. हे चुकीचे आणि किळसवाणे आहे, अशी टीका करत कार्नाड यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला होता. चित्तपटातील शिव्यांवर बंदी आणणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, अशा शब्दांत त्यांनी सेन्सॉर बोर्डाला फटकारले होते. शिव्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. शिव्यांना अनैतिक ठरवायचे झाले तर अगदी शेक्‍सपिअरपासूनचे निम्मे अधिक साहित्य बाद करावे लागेल, असेही ते एका कर्यक्रमात म्हणाले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com