नगरचे पदाधिकारी भाजप बदलणार

राज्यात सरकार स्थापनेत भाजपला यश आले नाही, त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता गृहित धरून भाजपने पक्षांतर्गत बांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून नगरमध्ये तयारी सुरू झाली आहे.
नगरचे पदाधिकारी भाजप बदलणार

नगर : आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्याचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी नगरमध्ये बैठका घेतल्या.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकिस आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड तसेच पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नगरमधून विशेष यश मिळाले नाही. 12 विरुद्ध 0 ची घोषणा भाजपनेत्यांकडून पूर्ण होऊ शकली नाही. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याचे समजते. 

राज्यात सत्ता स्थापनेबाबत भाजपने शब्द पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबद्दल बोलताना बापट म्हणाले, शब्द कोणी दिला होता, कोणी पाळला नाही, हे आम्हा कार्यकर्त्यांना माहिती नाही. त्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार बनावे, असा जनतेचा जनादेश आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com