girish bapat follows ramadas athwale style in loksabha | Sarkarnama

गिरीश बापट यांची लोकसभेतील `एंट्री` रामदास आठवले स्टाइल!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 जुलै 2019

नवी दिल्ली ः मोदी सरकारचा अर्थसंकल्प रामराज्य आणणारा आणि कॉंग्रेसचे दुकान बंद करणारा आहे, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची जोरदार प्रशंसा केली. बापट यांनी लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्टाइलमध्ये यमके जुळवून आपली कविता सादर केली.

महाराष्ट्रात मंत्री राहिलेल्या बापट यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या निमित्ताने आज लोकसभेत भाषण करताना शीघ्रकवी रामदास आठवलेंप्रमाणे चारोळीतून मोदीस्तुतीचाही राग आळवला. त्यांनी त्यासाठी केलेल्या वाक्यांची जुळवाजुळव पुढीलप्रमाणे

रोटी, कपडा और मकान 

यह है बजेट की शान

जनता को दिया सन्मान 

बढ जाएगी मोदीजी की शान

और बंद होगा कॉंग्रेस का दुकान,

गरिबोंको मिलेगा महान मकान

अशा शब्दांत त्यांनी काॅंग्रेसला टोला लगावला. तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावात निर्मलता आहे, माता सीता आणि रामाचेही नाव आहे, त्यामुळे रामराज्य येईल. तर, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हे भरताच्या भूमिकेत आहेत, अशी स्तुतिसुमनेही बापट यांनी उधळली.  गरिबांचे प्रश्‍न संसदेत उपस्थित करता येत असल्याचे समाधान व्यक्त करताना बापट म्हणाले, की निवडणूक काळातील "हर हर मोदी, घर घर मोदी' या घोषणेप्रमाणे मोदी सरकार सर्व सोयीसुविधा गरिबांच्या घरात पोचविणार आहे. गरिबांना घरे देण्यात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "डीसी' नियमात केलेले बदल, अतिक्रमण झालेल्या जागा घर बांधणीसाठी देण्याच्या निर्णयांमुळे हे शक्‍य होणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख