बापटांनी निकालाच्या आधीच चंद्रकांतदादांना कोथरूडचा पेढा भरविला

बापटांनी निकालाच्या आधीच चंद्रकांतदादांना कोथरूडचा पेढा भरविला

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाची तयारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली असून त्यांना खासदार गिरीश बापट यांनी आजही पेढाही भरवला

पाटील यांचा कोथरूडमधील विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही निर्धास्त आहेत. मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज पुण्यात झाली. या वेळी शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शशिकांत सुतार उपस्थित होते. या वेळी बापट यांनी पाटील यांचे अभिनंदन करून निकालाआधी पेढाही भरवला.

शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी पाटील यांच्या विजयानिमित्त शंभर किलो पेढ्यांची 
आॅर्डर दिली असून त्याच पेढ्यांनी विजय साजरा करण्यात आला. पाटील यांनी मतदारसंघातील आगामी कामांचे नियोजन समन्वय ठेवून कसे करावे, याबाबत या वेळी मार्गदर्शन केले.

निकालाच्या पूर्वसंध्येनिमित्त पुण्यातील नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पाटील, बापट, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. या वेळी पाटील यांनी आपल्याला अनेक कोळी गीते पाठ असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी टिमक्याची चोली, हे गीत गाऊनही दाखविले. बापट यांनी पुण्यातील मिसळीचे किस्से सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com