सुनील कांबळे यांच्यामागे आपली ताकद लावा : कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बापट यांचे आवाहन

सुनील कांबळे यांच्यामागे आपली ताकद लावा : कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बापट यांचे आवाहन

कॅंटोन्मेंट ः पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.

महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कॅंटोन्मेंटमध्ये नागरिकांच्या विविध समस्या आहेत. त्यातील केंद्राच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि राज्य सरकारच्या पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सुनील कांबळे प्रयत्न करतील, असेही बापट यांनी सांगितले.
मेळाव्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश जाधव यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

रवी सतिजा यांची फटकेबाजी

उत्तर प्रदेशातील आमदार रवी सतिजा यांनी या मेळाव्यात जोरदार भाषण केले. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीतील अनेक उदाहरणे देत त्यांनी विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या हिंदीतील भाषणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

या वेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे, सदानंद शेट्टी, गणेश बीडकर, उत्तर प्रदेशातील आमदार रवी सतिजा, शिवसेनेचे संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, अभय वाघमारे, शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या नगरसेविका मनीषा लडकत, प्रियांका श्रीगिरी, किरण मंत्री, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, संतोष इंदूरकर, संदीप लडकत. मुकुंदराव गायकवाड, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, महिपाल वाघमारे, शैलेंद्र चव्हाण, उत्तम भुजबळ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com