girish bapat | Sarkarnama

तूर खरेदीत आम्ही कमी पडलो- गिरीश बापट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो अशी स्पष्ट कबुली राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली. भविष्यात गोदाम अभावी शेतकऱ्यांचा माल खरेदी करता आला नाही असे होऊ नये म्हणून राज्य सरकार तीनशेहून अधिक गोदाम बांधणार असल्याचे बापट यांनी औरंगाबाद येथे बोलतांना सांगितले. 

तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विरोधात राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून तूर जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी तूर खरेदीच्या नियोजनात आमची चूक झाली, आम्ही यात कमी पडलो अशा शब्दांत सरकारची असहायता व्यक्त केली. शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन व्यापारीच खरेदी केंद्रांवर तूर आणून विकत असल्याचा प्रश्‍नाकडे बापटांचे लक्ष वेधले असता अशा अनेक तक्रारी येत असल्याचे मान्य केले. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तूर खरेदी केंद्रावर तूर घेऊन येणाऱ्याकडून कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जेवढा पेरा असेल त्याच प्रमाणात तूर खरेदी केली जाईल. 
फौजदारी गुन्हे दाखल करणार 
शेतकऱ्याच्या नावावर बोगसपणे व्यापारी तूर विक्री करत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यात असे प्रकार उघडकीस येताच संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचे ते म्हणाले. 22 एप्रिल पर्यंत तूर खरेदीची टोकन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. त्या सर्वांची तूर खरेदी केली जाईल. परंतु तूर ठेवायला आता जागाच नसल्याने खरेदी केंद्र सुरू ठेवण्याला कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ देता येणार नाही असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख