जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे गिफ्ट मिळणार 

जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे गिफ्ट मिळणार 

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा गुजरातसाठी खास ठरणार आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे येथे अनेक
विकासकामांचा श्रीगणेशा तर होईलच; पण त्याचबरोबर जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे मेगा गिफ्टदेखील यानिमित्ताने
राज्याला मिळेल. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून भारतभेटीवर आलेल्या बहुतांश बड्या नेत्यांनी गुजरातलाच भेटी दिल्या आहेत. यामध्ये चीन, जपान आणि इस्राईलचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांचा समावेश आहे.

ट्रम्प यांना प्रवासादरम्यान मार्गाभोवतीचा झोपडपट्टीचा परिसर दिसू नये म्हणून गुजरात सरकारने काही भागांमध्ये चारशे मीटरपर्यंत उंचीच्या भिंती उभारायला सुरुवात केल्याने राज्य सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे.  ट्रम्प गुजरातमध्ये केवळ दोन ते तीन तासांसाठी थांबतील. पण, त्यासाठी अहमदाबादच्या स्थानिक प्रशासनाने तब्बल ऐंशी कोटीचा खर्च केला असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर माध्यमांना दिली. ही रक्कम गुजरातच्या गृहमंत्रालयाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या दीडपटीने अधिक आहे. रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com