Ghatkopar Shivsena MNS and BJP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

'ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है ' मजकुराने घाटकोपरमध्ये खळबळ

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

..

घाटकोपर (बातमीदार) : घाटकोपर पश्‍चिम विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या प्रचाराचे वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकाने थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून 'माफ करा साहेब आमचे मत मनसेला' या मजकुराचा होर्डिंग लावल्याने विभागात चांगलीच चर्चा रंगली होती.
 ही चर्चा थांबत नाही तोच मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी चक्क शिवसेना कार्यालयात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. एवढेच नव्हे तर त्यानंतर 'ये अंदर की बात हे शिवसेना मनसे के साथ हे', असा मजकूर असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता . 

शाखाप्रमुख शिवाजी कदम यांनी यावर आक्षेप घेऊन मनसे उमेदवार गणेश चुक्कल व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आचारसंहिता भंग झाल्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे . त्यांनतर फेसबुकवरून हा मजकूर गायब झाला  आहे . 

शाखाप्रमुख शिवाजी कदम यांनी सांगितले की बुधवारी  सकाळी 11;15 च्या दरम्यान शाखा सुरु असताना मनसेचे पदाधिकारी व उमेदवार असलेले गणेश चुक्कल यांनी शाखेत जाऊन बाळासाहेब यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना वंदन केले व "ये अंदर की बात हे शिवसेना मनसे के साथ हे असा मजकूर लिहून फोटो सोशल मीडियावर शेअर करून शिवसेना संघटनेची बदनामी केली आहे. आचार संहितेचा देखील भंग केला आहे . याबाबत निवणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शाखाप्रमुख या नात्याने मी लेखी तक्रार दिल्याचे शिवाजी कदम यांनी सांगितले

दरम्यान हा सर्व प्रकार झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राम कदम यांनी गुरुवारी  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि  या भेटीची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली . 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत . प्रचार करण्यापूर्वी आम्ही शाखाप्रमुख कदम यांची परवानगी घेऊन कार्यालयात गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून वंदन केले यात गैर काय आहे ? बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि अखंड राहतील,  असे गणेश चुक्कल मनसे उमेदवार , घाटकोपर ( पश्‍चिम )  यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले .  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख