ख्रिस गेल आणि हर्षवर्धन जाधव यांचे विमानात फोटोसेशन...

ख्रिस गेल आणि हर्षवर्धन जाधव यांचे विमानात फोटोसेशन...

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवार श्रमपरिहारासाठी देश-विदेशात फिरायला गेले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रस्थापित उमेदवारांना तगडे आव्हान दिले आहे. तिसऱ्या टप्यातील मतदान संपल्यानंतर शीण घालवण्यासाठी हर्षवर्धन जाधव सध्या टूरवर आहेत. अशाच एका टूर दरम्यान विमान प्रवासात त्यांची भेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्याशी झाली. मग गेल सोबत फोटो काढण्याच मोह त्यांना आवरला नाही. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर हर्षवर्धन जाधव सध्या आरामच्या मूडमध्ये आहेत. अशाच एका पर्यटन प्रवासा दरम्यान एअर इंडियाच्या विमानात त्यांची गाठ किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या ख्रिस गेल नावाच्या वादळाशी झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धा गाजवत चौकार, षटकारांची आतषबाजी करणारा स्फोटक फलंदाज आपल्याच विमानातून प्रवास करत असल्याचे कळताच हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि गेलने ती हसत स्वीकारली सुध्दा. 

मग विमानातच गेल-जाधव यांचे फोटो सेशन रंगले. गेल-जाधव यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. एक क्रिकेटचे मैदान गाजवणारा, तर दुसरा राजकारणाच्या मैदानात माहीर, अशा दोन व्यक्तीमत्वांची ही अचनाक झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना आणि आता स्वतःचा स्वतंत्र पक्ष असा वेगवान राजकीय प्रवास असलेले कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या लोकसभा निवडणूकीमुळे. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून त्यांनी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना आव्हान दिले आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असल्यामुळे खैरे यांनी नुकताच दानवे यांच्यावर जावयाला मदत आणि आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप केला होता. या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्यावर राजकीय वर्तुळाचे चांगलेच लक्ष आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्यातील मतदान 23 एप्रिल रोजी पार पडल्यानंतर हर्षवर्धन जाधव सध्या सुट्याचा आनंद लुटतायेत. या दरम्यानच विमान प्रवासात त्यांची खिस गेल सोबत भेट झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com