Gazetted officers to Give one day salary for flood relief | Sarkarnama

महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी पुरग्रस्तांच्या मदतीला सरसावले; एक दिवसांचा पगार देणार, 

दिनेश गोगी
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे असंख्य नागरिकांचा जीव गेला असून सर्वांच्याच संसारपयोगी-जीवनावश्‍यक वस्तु पुराच्या पाण्यात संपुष्टात आल्या आहेत.या पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी सरसावले आहेत.या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पुरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शवली आहे.

उल्हासनगर : सांगली, कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे असंख्य नागरिकांचा जीव गेला असून सर्वांच्याच संसारपयोगी-जीवनावश्‍यक वस्तु पुराच्या पाण्यात संपुष्टात आल्या आहेत.या पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी सरसावले आहेत.या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पुरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शवली आहे. तसे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

उल्हासनगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख,अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. 
लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर महत्वाच्या पदांवर दिड लाख अधिकारी कार्यरत आहेत.त्यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही संघटना आहे.सांगली कोल्हापुरात जी पुरपरिस्थिती ओढावली आहे. संकट कोसळले आहे. त्यास मदत म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांच्या महासंघातील सर्व दीड लाख अधिकारी मुख्यमंत्री सहायता निधिस एक दिवसाचा पगार देत असल्याचे पत्र संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समिर भाटकर, कोषाध्यक्ष नितिन काळे व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांच्या दुर्गा महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. सोनाली कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा आपात्कालीन वा पुरपरिस्थिती ओढावते तेंव्हा तेंव्हा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ मुख्यमंत्री सहायता निधिस एक दिवसाचा पगार देते,असे पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख, मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख