gaykwad | Sarkarnama

खासदार रवींद्र गायकवाडांचे विमान उडाले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

उमरगा : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी लादण्यात आलेली विमान प्रवासबंदी उठवल्यानंतर शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी आज (ता.20) आपला पहिला विमान प्रवास केला. दुपारी सव्वाचारच्या हैदराबाद-दिल्ली या एअर इंडियाच्या विमानात बसून ते दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे विमानात बसण्यापूर्वी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. महिनाभरापूर्वी पुणे-दिल्ली प्रवासात खासदार गायकवाड यांचा एअर इंडियाच्या अधिकाऱ्याशी वाद झाला होता. यातून गायकवाड यांनी त्या अधिकाऱ्यास मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजले होते. 

दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर एअर इंडियासह सहा विमान कंपन्यांनी खासदार गायकवाड यांना विमान प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. ही विमान बंदी हटवण्यासाठी शिवसेनेने संसदेत आक्रमक पवित्रा घेऊन गायकवाड यांच्यावरील विमान प्रवेश बंदी हटवण्यास सरकारला भाग पाडले होते. त्यासाठी मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही अशी धमकीही देण्यात आली होती.  या पार्श्‍वभूमीवर गायकवाड यांच्या आजच्या विमान प्रवासाला महत्त्व प्राप्त झाले होते. एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्‍लासमधून त्यांनी हैदराबाद-दिल्ली असा प्रवास केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख