gauri lankesh | Sarkarnama

गौरी लंकेशच्या हत्येविरोधात मुंबईत मोर्चा 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून केलेल्या हत्येविरोधात आज हुतात्मा चौकात डाव्या आणि पुरोगामी पक्ष, संघटनांनी निदर्शने केली. केंद्र सरकारसोबत हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

पुरोगामी विचारांना, आणि त्यातही माध्यमांतील लोकांनाही अशा प्रकारे हत्या करून संपवले जात असल्याने आता आपण गप्प राहून चालणार नाही, यासाठी सरकारला जाब विचारू आणि त्यासाठी मुंबईत जंगी मोर्चा काढून असा इशारा यावेळी देण्यात आला. 

लंकेश यांच्या झालेल्या हत्येविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच राज्यातील भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डाव्या, पुरोगामी, समाजवादी आदी पक्ष संघटनांनी हुतात्मा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंबेडकर यांच्यासह कॉ. विश्‍वास उटगी,कॉ.प्रकाश रेड्डी, कॉ. शैलेंद्र कांबळे, रिपाइं नेते व साहित्यिक अविनाश डोळस आदीनी यावेळी सरकारविरोधात आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

यापूर्वी देशात विचारांची लढाई कायम होती, परंतु आता विचारांनाच गोळ्या घालण्याची भाषा आणि त्याप्रकारचे कृत्य केले जात आहे, यातूनच दाभोळकर-पानसरे-कलबुर्गीसारख्या पुरोगामी विचारवंताना संपविण्यात आले, यासाठी आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले गेले, आणि यानंतर आता कोण, असा सवालही आपण केला, मात्र आता सरकारला गप्प बसू देता कामा नये, त्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, समाजवादी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारू यासाठी मोर्चा काढू असा इशारा आंबेडकर यांनी दिला. तर संघवाद से आझादी, मनुवाद से आझादी, हम सभ गौरी लंकेश अशा जोरदार घोषणांनी यावेळी हुतात्मा चौक परिसर दणाणून गेला होता. भारिप बहुजन महासंघासोबतच लोकशाही आघाडी, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, शेकाप, जॉईंट एक्‍शन कमिटी फॉर सोशल जस्टीस, बीआरएसपी, रिपाइं आदी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींचा यावेळी मोठा सहभाग होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख