नागनाथअण्णा नायकवडींचे नातू शिवसेनेत

नागनाथअण्णा नायकवडी यांनी सेना भाजपला कडाडून विरोध केला.
नागनाथअण्णा नायकवडींचे नातू शिवसेनेत

पुणे: दिवंगत स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ते इस्लामपूर मतदारसंघात सेनेच्या तिकीटावर लढतील.

नागनाथअण्णा नायकवडी यांनी सेना भाजपला कडाडून विरोध केला, मात्र अण्णांच्या निधनातंर त्यांचे पुत्र वैभव यांनी भाजपशी सलगी वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा वाळवा तालुक्यात आली असताना वैभव नायकवडी, गौरव नायकवडी सहभागी झाले होते. नायकवडी कुटुंबाचे कार्यक्षेत्र असलेल्या इस्लामपूर मतदारसंघात भाजप लढणार, असे इतके दिवस चित्र होते. भाजपात इच्छुकांची मोठी स्पर्धा होती. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ सेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळे गौरव नायकवडी यांनी सेनाप्रवेश केला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com