Gathering information about loan waiver : Fadnis | Sarkarnama

कर्जमाफीसंदर्भात माहिती संकलीत करण्याचे काम सुरू - मुख्यमंत्री

ब्रह्मदेव चट्टे : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यामुळे राज्यातही भाजप - सेनेसह सर्वपक्षीय आमदारांनी कर्जमाफीच्या विषय लावून धरला आहे. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आमदारांनी विषय आहे. कर्जमाफीसंदर्भात माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

शेतकरी आत्महत्यावरून शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासाअगोदर तात्काळ कर्जमाफीची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री निवेदन करत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत मी आजच युपीचे माँडेल काय याची माहिती घेण्याचे अर्थ सचिवांना सांगितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवत मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांचा संघर्ष कशासाठी सुरू हे त्यांनीच माहित आहे. याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही. राज्य सरकार भाजप सेनेच्या आमदारांच्या मागणीशी सहमत असून मी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूचा कर्जमाफीचा विषय वेगळा असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी कराचे का नाही हे उच्च न्यायालायने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार वेगवेगळ्या राज्याचे माँडेल काय आहे हे तपासत आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्राने मदत दिली नाही, तर कर्जमाफी कशी करता येईल. ते पहाणार असून शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख