'स्वीकृत'चे ही मोठे राजकारण : तज्ज्ञांऐवजी दुसऱ्यांनाच संधी

विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार कायदेशीर तरतुदीनुसार स्वीकृतसदस्य निवडीची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली असून पालिका आयुक्तया सदस्यांच्या नावांची शिफारस त्यांच्याकडे आलेल्या अहवालानुसार पुढीलसर्वसाधारण सभेला करतील --उल्हास जगताप, नगरसचिव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
'स्वीकृत'चे ही मोठे राजकारण  : तज्ज्ञांऐवजी दुसऱ्यांनाच संधी

हापौर,उपमहापौर, गटनेते आणि विषय समिती सदस्य निवडीनंतर
आता स्वीकृत तथा नामनिर्देशित सदस्य निवडीची लगबग पिंपरी-चिंचवडमध्ये
सुरू झाली असून पुढील महिन्याच्या पालिकेच्या आमसभेत या नावांची घोषणाहोणार आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची (उदा. डॉक्‍टर,इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट,प्राध्यापक, मुख्याध्यापक, महापालिकेचे निवृत्त उपायुक्त वा सहाय्यक आयुक्त, सामाजिक कार्यकर्ते) नियुक्ती करण्याची कायदेशीर तरतूद टाळून पुन्हा तेथे राजकारण्यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे.

सर्वच पक्षांनी आपले पराभूत झालेले उमेदवार, डावलले गेलेले पदाधिकारी यांची वर्णी लावण्यासाठी व्युहरचना सुरू केली आहे. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. तेथे शंभर टक्के राजकारणीच निवडून गेले. त्यांच्या जोडीने सभागृहात पालिका प्रशासनाचे  विशेष ज्ञान असलेली व्यक्ती (उदा. निवृत्त पालिका उपायुक्‍त, सहाय्यक आयुक्त) तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात आहे. मात्र, तो राज्यभर सर्वच राजकीय पक्षांकडून धाब्यावर बसविला जात असल्याचे आतापर्यंतचे निरीक्षण आहे.

आताही या नियमानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पाच स्वीकृत सदस्य नेमण्याची कार्यवाही सुरू केली आहे. विविध पक्षांचे गटनेते, सभागृह नेते यांच्या सल्याने पालिका आयुक्त ही नेमणूक करतात.

उद्योगनगरीत निवडून आलेले 128 नगरसेवक आहेत. या संख्याबळानुसार पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करावयाचे आहेत. 25 नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपचे 77 हे संख्याबळ विचारात घेता त्यांच्या सदस्यसंख्येत आणखी तिघांची भर पडणार आहे.

सत्तेतून पायउतार होऊन आता विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीचा एक नामनिर्देशित सदस्य होणार आहे. पाचव्या स्वीकृत सदस्यासाठी मोठे राजकारण व पर्यायाने घोडेबाजार होणार आहे. त्यासाठी शिवसेना (नऊ) आणि अपक्ष आघाडीच्या (पाच) तुलनेने राष्ट्रवादीकडे अधिक नगरसेवक (11) आहेत. त्यामुळे पाचवा स्वीकृत कसा व कोणाचा होतो, याविषयी मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, भाजपकडे, या तीन जागांसाठी तब्बल तीसजण इच्छुक असून ते सर्व पक्षाचे पदाधिकारी व नुकतेच निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार आहेत. राष्ट्रवादीही पराभूत झालेल्या एका तालेवार माजी नगरसेवकाला स्वीकृतसाठीची संधी देण्याच्या विचारात आहे.

एकूणच राजकारण वगळता इतर क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी देण्याऐवजी पुन्हा राजकारणीच स्वीकृत सदस्य म्हणून घेऊन या अराजकीय पदासाठीही राजकारणच करण्याचेसर्वच पक्षांनी ठरविले असल्याचे दिसून येत आहे.

विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार कायदेशीर तरतुदीनुसार स्वीकृत
सदस्य निवडीची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली असून पालिका आयुक्त
या सदस्यांच्या नावांची शिफारस त्यांच्याकडे आलेल्या अहवालानुसार पुढील
सर्वसाधारण सभेला करतील -
-उल्हास जगताप, नगरसचिव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com