...राजेश टोपेसाहेब तुम्ही सुध्दा? - No Mask and Social Distancing in Rajesh Tope's Meeting at Jalana | Politics Marathi News - Sarkarnama

...राजेश टोपेसाहेब तुम्ही सुध्दा?

लक्ष्मण सोळुंके
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

डाॅ. टोपे काल जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी टोपे यांच्या समवेत छायाचित्रे काढून घेतली. त्यावेळी टोपे यांच्यासह बहुतेकांनी मास्क घातले नव्हते.

जालना : कोरोनापासून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा असे आवाहन करणारे राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातच या सगळ्या तत्त्वांना हरताळ फासला गेल्याचा प्रकार येथे घडला आहे. खुद्द मंत्री महोदयांनीही कार्यकर्त्यांच्या गर्दीत मास्क न लावता उभे रहात फोटो काढून घेतल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

डाॅ. टोपे काल जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी टोपे यांच्या समवेत छायाचित्रे काढून घेतली. त्यावेळी टोपे यांच्यासह बहुतेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे त्यामुळे जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना 'सोशल डिस्टनसिंग पाळा, आणि मास्क वापरा' असा सल्ला कोण देणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.  असा प्रश्न या फोटोच्या निमित्ताने उपस्थित झालाय.

दरम्यान, जालना जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत अतिवृष्टीमुळे मूग व कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीच्या दरम्यान त्यांनी हे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना दिले आहेत. शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम मिळावी यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देत यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री तसेच सचिवांशी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तातडीने देण्यासंदर्भात चर्चासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

जालन्या काल आणखी नव्याने  ११३ संशयित रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या बाधित ४ हजार १४२ वर पोहचली आहे,तर आत्ता पर्यंत २ हजार ८९७ रुग्णाणी  कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आलीय, कोरोना बाधित १ हजार ११९ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काल  ६ कोरोना बधिताचा रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १२६ वर पोहचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख