भाजपच्या राज्य युवा कार्यकारिणीतील घोळ; जळगावचे हिरालाल पाटील कोण? - BJP Jalgaon Youth wing Executive committee Appointment in Question | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या राज्य युवा कार्यकारिणीतील घोळ; जळगावचे हिरालाल पाटील कोण?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

जळगाव जिल्ह्यातून भाजप युवा मोर्चाच्या राज्यकार्यकारिणीवर नियुक्त झालेले हिरालाल पाटील कोण आहेत. याची माहिती आज जळगाव जिल्ह्यातील भाजपलाच माहिती नसल्याचे दिसून आले आहे.युवा मोर्चाची राज्य कार्यकारिणी जाहिर झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याला संधी मिळाल्याचा आनंद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना झाला. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा शोध करण्यात आला मात्र हे हिरालाल पाटील आहेत कोण? याचा मात्र कार्यकर्त्यांना तपासच अद्यापही लागलेला नाही

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणी वादग्रस्त ठरत आहे. सोशल मिडीया कार्यकारिणीवरून वाद सुरू असतांनाच आता युवा मोर्चाच्या राज्यकार्यकारिणीबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या कार्यकारिणी सोशल मिडीया विभागात जळगाव जिल्ह्यातील हिरालाल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. परंतु हे हिरालाल पाटील कोण? याचा शोध आता भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीकडून सुरू झाला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे विविध विभागाच्या राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात येत आहे. त्यात भारतीय जनता युवा मोर्चाची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहिर केली आहे. यात तीन उपाध्यक्ष, ९ चिटणीस, ११ कोषाध्यक्ष,एक कार्यालय प्रमुख, १ युवती संयोजिका, एक सहसंयोजिका, एक सोशल मिडीया विभाग संयोजक, चार कार्यकारिणी सदस्य, व २० सदस्य आहेत. या कार्यकारिणीत प्रत्येक जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांना संधी विविध विभागात संधी देण्यात आली आहे. 

खानदेशातून धुळे व जळगाव जिल्ह्यातून दोघांना संधी देण्यात आली आहे. यात धुळे येथून हर्षल विभांडिक तर जळगाव येथून हिरालाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभांडीक हे धुळे शहरातील कार्यकर्ते आहेत. त्यांची सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. तर जळगाव जिल्हय्यातून हिरालाल पाटील यांची सोशल मिडीया विभागप्रमुखात नियुक्ती झाली आहे.

हिरालाल पाटील कोण?
जळगाव जिल्ह्यातून भाजप युवा मोर्चाच्या राज्यकार्यकारिणीवर नियुक्त झालेले हिरालाल पाटील कोण आहेत. याची माहिती आज जळगाव जिल्ह्यातील भाजपलाच माहिती नसल्याचे दिसून आले आहे.युवा मोर्चाची राज्य कार्यकारिणी जाहिर झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याला संधी मिळाल्याचा आनंद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना झाला. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा शोध करण्यात आला मात्र हे हिरालाल पाटील आहेत कोण? याचा मात्र कार्यकर्त्यांना तपासच अद्यापही लागलेला नाही. अमळनेर तालुक्यात हिरालाल पाटील आहेत. मात्र ते तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट जिल्हास्तरावर विचारणा केली. मात्र त्या ठिकाणीही हिरालाल पाटील याची कोणतीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

थेट प्रदेशाध्यक्षाकडे शोध?
युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत हिरालाल पाटील आहे कोण? याची माहिती आम्हाला द्यावी असे पत्र जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रदेश स्तरावर प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत पत्रात म्हटले आहे, की या नावाबाबत प्रिंटीग मिस्टीक झाली आहे काय? त्यांचे गावाचे नाव चुकले आहे काय?याचीही माहिती द्यावी.

राज्य कार्यकारिणीचा वाद
भारतीय जनता पक्षातर्फे विविध राज्य कार्यकारिणी नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यातील नावावरून वाद सुरू आहे. सोशल मिडीया कार्यकारिणीवरूनही जोरदार वाद सुरू आहे. अनेक नावे परस्पर घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातून कार्यकारिणीवर घेण्यात आलेला कार्यकर्ता कोण हे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनच माहित नसल्यामुळे भाजपतील कार्यकारिणी निवडीतील घोळ चव्हाट्यावर आला आहे. 
 Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख