बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे

सकाळी सहा वाजता वाक्षेवाडीच्या मैदानावर हजारो तरूणासमोर पठारावर शर्यत पार पडली.
FIR against MLA Gopichand padalkar for bullock cart race
FIR against MLA Gopichand padalkar for bullock cart race

सांगली : प्रशासन आणि सरकारच्या नाकावर टिचून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अखेर शुक्रवारी बैलगाडा शर्यती पार पाडून दाखवल्या आहेत. पण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर विनापरवाना सांगलीच्या झरे येथे बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह त्यांच्या ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (FIR against MLA Gopichand padalkar for organizing bullock cart race)

मोजके निवडक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मध्यरात्रीच वाक्षेवाडीच्या माळावर ट्रॅक्‍टरच्या सहायाने मैदान बनवले होते. पहाटे शर्यतीसाठी मोजक्याच बैलगाड्या दाखल झाल्या. सकाळी सहा वाजता वाक्षेवाडीच्या मैदानावर हजारो तरूणासमोर पठारावर शर्यत पार पडली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांना उपस्थित राहता आले नाही. शर्यती पार पडल्यानंतर ते मैदानावर आले. यावेळी राज्यभरातून दाखल झालेले हजारोंच्या संख्येने तरुण आले होते. 

प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलिस-प्रशासनाला चकवा देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर सूर्योदयासोबत बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीसाठी राज्यातून विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण शेतकरी आले होते. शर्यतीनंतर आमदार पडळकर यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर उभारणाऱ्या आंदोलनाला साथ देण्याचे आणि तरुणांनी शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले.            

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणांना पोलिस प्रशासनाशी कोणताही वाद न करता आणि शर्यतीला गालबोट न लावता शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन उभा करून त्याला साथ देण्याचे आवाहन केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत बेकायदेशीरपणे शर्यतीचे आयोजन केल्यामुळं पडळकर यांच्यासह 41 जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, बेकायदा जमाव जमविणे, कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com