ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिधान केली लष्करी जवानाची कॅप - Minister Hassan Mushriff wear Army Jawans Cap | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिधान केली लष्करी जवानाची कॅप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

सैनिकांकडून मिळालेली सैनिकी टोपी परिधान करताच मंत्री श्री.मुश्रीफ यांनी लष्करी शिस्तीत या जवानांना सॅल्यूट केला. त्यानंतर जवानांनीही प्रतिसाद देत मुश्रीफ यांना सॅलूट केला आणि वातावरण भारावून गेले

कागल  : बिद्री (ता. कागल) येथून आलेल्या आजी-माजी सैनिकांनी आणलेली सैन्यदलातील जवानाची कॅप ग्रामविकास मंत्री नामदार हसन  मुश्रीफ यांनी मोठ्या अभिमानाने परिधान केली. मालमत्ता कराच्या सुटबाबत सैनिक बंधू-भगिनी मंत्री मुश्रीफ यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी टोपी व सॅनिटायझर देऊन त्यांनी श्री.मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

सैनिकांकडून मिळालेली सैनिकी टोपी परिधान करताच मंत्री श्री.मुश्रीफ यांनी लष्करी शिस्तीत या जवानांना सॅल्यूट केला. त्यानंतर जवानांनीही प्रतिसाद देत मुश्रीफ यांना सॅलूट केला आणि वातावरण भारावून गेले. यावेळी संदिप पोवार, मारुती पाटील, विनोद पाटील, विनायक पाटील, राकेश पाटील उपस्थित होते.

संकेत आनंदा पाटील व भागवत मारुती पवार, म्हणाले, "मुश्रीफसाहेब घर दार, कुटूंब गावाकडे सोडून भारतमातेसाठी आम्ही सीमेवर लढत असतो. अशा वेळी आमच्या सर्व कुटूंबीयांची काळजी घेणारे तुम्हीच आमचे कुटुंब प्रमुख आहात," हे ऐकून मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू आले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख