शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पावसाने पिकांचे नुकसान झाले असल्यास हे करा!

राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Heavy rainfall in many places of Maharashtra causes crop damage
Heavy rainfall in many places of Maharashtra causes crop damage

पुणे : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने पीक वाहून केल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. (Heavy rainfall in many places of Maharashtra causes crop damage)

राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना (Crop Insurance) राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या खरीब हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गतही भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपन्यांना पूर्वसुचना देण्याबाबत कृषी विभागाने आवाहन केले आहे.  योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते.

महाराष्ट्रात जूलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना महत्वाचे काम करावे लागणार आहे. पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप (Crop Insurance App) किंवा संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंव कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

शेतकरी लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात नुकसानीची माहिती देऊ शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी तत्काळ जवळच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com