गणपतराव देशमुख ठरले सर्वाधिक पेन्शन घेणारे माजी आमदार

माजी आमदारांच्या पेन्शनचा राज्याच्या तिजोरीवर 65 कोटींचा भार...
ganpatrao will get highest pension
ganpatrao will get highest pension

सोलापूर : सांगोला (जि. सोलापूर) येथील माजी आमदार गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात तब्बल 51 वर्षे आमदार राहिले.  2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली.  देशमुख यांना पहिल्या पाच वर्षांसाठी 50 हजार रुपये तर; पुढील प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे 92 हजार अशी एकूण एक लाख 42 हजार रुपयांची दरमहा पेन्शन मिळणार आहे. सर्वाधिक पेन्शन घेणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरणार आहेत, मात्र त्यांना अद्यापही पेन्शनचा लाभ मिळालेला नाही.

माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून पेन्शन दिली जाते. पहिल्या पाच वर्षांसाठी दरमहा 50 हजार रुपये तर त्यानंतरच्या आमदारकीच्या प्रत्येक एका वर्षासाठी दोन हजारांप्रमाणे वाढ केली जाते. राज्यातील 789 माजी आमदारांना पेन्शनपोटी दरवर्षी 65 कोटी 27 लाख 60 हजार रुपये वितरीत होतात. राज्य सरकारच्या योजनेनुसार पाच वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदारांना दरमहा प्रत्येकी 50 हजारांची पेन्शन दिली जाते. त्यानंतर 10 वर्षे आमदार राहिलेल्यांना 60 हजार तर 15 वर्षे आमदार राहिलेल्यांना 70 हजार अशी पेन्शन दिली मिळते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक माजी आमदार झाले आहेत. त्यामुळे पेन्शन योजनेसाठी किती आमदार नव्याने पात्र झाले आहेत, एकूण किती रक्‍कम या योजनेसाठी खर्च होते, याची माहिती संकलनाचे काम सुरु असल्याचे वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी सांगितले.

राज्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर अन्‌ त्यातून भरावे लागणारे व्याज, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च आणि सरकारला दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नाची अपडेट माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वित्त विभागाकडून मागविली आहे. मार्च 2020 मध्ये (राज्याच्या बजेटपूर्वी) श्‍वेतपत्रिका काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सध्या माजी आमदारांमध्ये 50 ते 60 हजारांपर्यंत पेन्शन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ठरलेल्यांना अद्याप पेन्शनचा लाभ मिळाला नसून त्यांच्यासाठी आगामी बजेटमध्ये वाढीव तरतूद केली जाईल, असे नियोजन असल्याचेही वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी...
- राज्य सरकारच्या खांद्यावर 6.71 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा
- राज्यातील 789 माजी आमदारांना पेन्शन योजनेचा मिळतोय लाभ
- माजी आमदार पेन्शन योजनेसाठी दरवर्षी सरासरी 65 कोटींचा खर्च
- राज्य सरकारने वित्त विभागामार्फत मागविली सद्यस्थितीची माहिती

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com