ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुखांच्या यशाचे गमक झाले `व्हायरल`

गणपतराव देशमुख हे ९१ वर्षांचे आहेत. तब्बल ११ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या साधेपणाबद्दल, एसटीतील प्रवासाबद्दलनेहमीच आदराने बोलले जाते. मात्र केवळ साधेपणा हे त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय यशाचे गमक नसून कार्यक्षमता देखील तितकिच महत्त्वाची असल्याचे त्यांनी या साध्या घटनेतून दाखवून दिले आहे. त्यामुळेच सोशल मिडियात त्यांची ही छोटीशी कृती कौतुकास्पद ठरली आहे.
ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुखांच्या यशाचे गमक झाले `व्हायरल`

पुणे : विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे नागरिकांच्या किरकोळ समस्यांचीही कशी दखल घेतात आणि ती समस्या सोडविण्यासाठी कसा प्रयत्न करतात, याचे आणखी एक उदाहरण सोशल मिडियावर `व्हायरल` झाले आहे.

पेनुर या गावातून मोहोळमध्ये शिक्षणासाठी जाणारे बरेच विद्यार्थी आहेत. या गावातील प्रेरणा विष्णू गवळी या विद्यार्थिनीने या एसटी प्रवासातील अडचण पाटील यांना साध्या पोस्ट कार्डद्वारे कळवली. मोहोळला जाण्यासाठी सकाळ सात ते सव्वा आठ पर्यंत एकच एसटी थांबते. या वेळेत आणखी एक एसटी थांबली तर विद्यार्थ्यांच्या सोईचे होईल, अशी मागणी या विद्यार्थिनीने त्यांना पत्राद्वारे केली होती.

हे पत्र देशमुख यांना ३१ डिसेंबर २०१७ रोजी मिळाले. त्याच दिवशी त्यांनी पंढरपूर येथील एसटी आगारप्रमुखांशी फोनवर बोलून सकाळच्या वेळेत पेनुर येथे थांबा देण्याची विनंती केली. केवळ फोनवर काम होणे शक्य नसल्यास मी तुम्हाला लेखी पत्रही देतो, असे त्यांनी आगारप्रमुखांना सांगितले. आगारप्रमुखांनी पत्राची गरज नसल्याचे सांगत आपल्या सूचनेनुसार उद्यापासून एसटी पेनुर येथे सकाळच्या वेळी थांबतील, असे अाश्वासन आमदारांना दिले. 

या साध्याशा घटनेबाबत आणि समस्या सोडविण्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती देशमुख यांनी संबंधित विद्यार्थिनीला उलट टपाली कळवली. या छोट्याशा पत्रातील भाषाही अतिशय बोलकी आणि संवादी आहे. तुमचे आधीचे पत्र मिळाले. पण त्या काळात मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशात होतो, अशी कबुली यात दिली. ३१ डिसेंबरच्या पत्रावर काय कार्यवाही केली, हे त्यांनी मोजक्या शब्दांत सांगितले आहे. समस्या न सुटल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा, असेही पत्रात म्हटले आहे. देशमुख यांचा सांगोला हा विधानसभा मतदारसंघ आहे. संबंधित समस्या ही मोहोळ मतदारसंघातील होती. तरी त्यांनी त्याची दखल घेतली. पेनुर गणपतरावांचे मूळ गाव आहे. 

गणपतराव देशमुख हे ९१ वर्षांचे आहेत. तब्बल ११ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या साधेपणाबद्दल, एसटीतील प्रवासाबद्दल नेहमीच आदराने बोलले जाते. मात्र केवळ साधेपणा हे त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय यशाचे गमक नसून कार्यक्षमता देखील तितकिच महत्त्वाची असल्याचे त्यांनी या साध्या घटनेतून दाखवून दिले आहे. त्यामुळेच सोशल मिडियात त्यांची ही छोटीशी कृती कौतुकास्पद ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com