विरोधक मैदानात आल्यास सामन्याला तयार : गणपत गायकवाड

..
Gayakwad Kalyan
Gayakwad Kalyan

प्रचारसभेत विकासकामे आणि रखडलेल्या कामांबाबत मी बोलत असताना विरोधक समाजमाध्यमांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. समाजमाध्यमांवर दिवसभर ‘टाईमपास’ होतो आणि त्यासाठी मला वेळ नाही. अशा प्रकारे टीका करण्यापेक्षा त्या सर्वांनी मैदानात येऊन मला आमने-सामने प्रश्‍न विचारावेत. मी त्यांना नक्कीच उत्तरे देईन, असे आव्हान कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी विरोधकांनी दिले आहे. ‘सरकारनामा’शी  वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत विस्तृत चर्चा करून विकासाचा संकल्प केला.

फेरीवाल्यांवर काय उपाययोजना करणार?
कल्याण पूर्वेची भौगोलिक रचना पाहता, मोकळी जागा खूप कमी आहे.  फेरीवाल्यांबाबत जी ओरड होतेय, ती समस्या हप्तेखोर नगरसेवकांमुळे वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी फेरीवाल्यांसाठी ‘ना फेरीवाला’ आणि ‘फेरीवाला क्षेत्र’ अशी विभागणी करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे विभागणी होण्यासाठी आपण पाठपुरावा करू.


वाहतूक कोंडी-फेरीवाला गुंता कसा सोडवणार?
मोकळ्या जागेअभावी अनेक फेरीवाल्यांना रेषा आखून जागा ठरवून दिली आहे. भविष्यात भाजी मंडईच्या आरक्षित भूखंडावर मंडई बांधून ही समस्या दूर करू. कल्याण पूर्वमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. येथील यू टाईप रोड मोठा झाला पाहिजे. या लोकांनी ४० फूट रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र माझा भविष्यात हा रस्ता ८० फूट करण्याचा मानस आहे. त्या रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांचे प्रथम पुनर्वसन झाले पाहिजे आणि ते झाल्यावर काम सुरू करावे, अशी माझी माफक मागणी आहे.


दूषित पाणीपुरवठ्यावर काय उपाय करणार?
दूषित पाण्यामुळे सर्वसामान्यांना साथीच्या आजारांचा त्रास होतो. हा पाणी प्रश्‍न सोडवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी मी दोन कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला; पण महापालिका अधिकारी आणि काही नगरसेवक यांच्यात उदासीनता दिसून येते. ज्या नवीन पाईपलाईन टाकल्या आहेत, त्या गटारामधून टाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. पण, आपण राज्य सरकारच्या ‘अमृत’ आणि इतर योजनांद्वारे काम करत आहोत. येणाऱ्या काळात ही समस्या दूर होईल.


सरकारी रुग्णालयाचे काय?
‘गीता हरकिसन दास’ दवाखाना झाला, तेव्हा मी पहिल्यापासून विरोध करत होतो. त्याऐवजी चांगल्या पद्धतीने रुग्णालय बनवा, अशी मागणी केली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे ते शक्‍य झाले नाही. तेथे उपचारासाठी जाणाऱ्या गरोदर महिलांना पहिल्या वा दुसऱ्या माळ्यावर चढून जाणे कठीण जाते. तेथे स्ट्रेचर जाऊ शकेल अशा लिफ्टसह बांधकाम होण्याची गरज होती; पण तसे बांधकाम झाले नाही. साफसफाई करून, स्वच्छता राखणे हे महापालिका आणि नगरसेवकांचे काम आहे. एका नगरसेवकाच्या घराजवळ हा दवाखाना असूनही त्या दवाखान्यामध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्या. ही निश्‍चितच खंत करण्यासारखी बाब आहे. मात्र, आगामी काळात मोठे सुसज्ज रुग्णालय उभारू.  

क्रीडांगणाचे काम रखडले?
क्रीडांगणासाठी निधी आणला; मात्र त्याचे कंत्राट शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला मिळाले आहे. दोन गॅलरी बनवण्याच्या त्या कामाची दीड कोटीची निविदा होती. परंतु, त्यांनी या कामाची वाट लावली. त्यांनी एकच गॅलरी बांधून अर्धवट काम केले आणि तेही निकृष्ट दर्जाचे. त्यामुळे त्यांनी सरकारचे ७५ लाख परत करावेत, अशी मागणी मी केली आहे. त्यामुळे बंडखोर माझ्यावर खोटे आरोप करत आहेत.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com