SARKARNAMA SPECIAL : गावोगावी सायकलवर जाऊन जिल्हाधिकारी विजय कुलांगेंचा कोरोनाविरोधात जागर - Ganjam Collector Vijay Kulange visits village to village on bicycle to spread awarness against COVID19 | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA SPECIAL : गावोगावी सायकलवर जाऊन जिल्हाधिकारी विजय कुलांगेंचा कोरोनाविरोधात जागर

संजय आ. काटे
सोमवार, 30 मार्च 2020

मूळचे नगरचे व सध्या ओडिशामध्ये नियुक्त असलेले जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी कोरोनाला रोखून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गंजाममध्ये 22 हजार जणांना "होम क्वारंटाईन' केले असले, तरी एकही बाधित रुग्ण नाही. थेट सायकलवरून कुलांगे लोकांशी संपर्क साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. प्रशासनाचे त्यांच्यासोबत माणुसकीचे नाते निर्माण करीत आहेत.

श्रीगोंदे : मूळचे नगरचे व सध्या ओडिशामध्ये नियुक्त असलेले जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी कोरोनाला रोखून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गंजाममध्ये 22 हजार जणांना "होम क्वारंटाईन' केले असले, तरी एकही बाधित रुग्ण नाही. थेट सायकलवरून कुलांगे लोकांशी संपर्क साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. प्रशासनाचे त्यांच्यासोबत माणुसकीचे नाते निर्माण करीत आहेत.

प्राथमिक शिक्षक, विक्रीकर अधिकारी ते तहसीलदार, अशा क्रमाने जिल्हाधिकारी झालेले कुलांगे सध्या गंजाम (ओडिशा) जिल्ह्यात कार्यरत आहेत. कोरोनाचे वादळ जगभर घोंघावत असताना, गंजाममध्ये एकही बाधित रुग्ण नाही. तेथे बाहेरून आलेल्या 22 हजार लोकांना सुरक्षित "क्वारंटाईन' करण्याची किमया कुलांगे यांनी साधली आहे. कोरोनाची चाहूल लागताच त्यांनी प्रथम जिल्ह्यात देऊळबंदीचा निर्णय घेतला. कोरोनाची भीती ओळखून वेळीच सुरू केलेल्या उपाययोजना आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी ठरल्या आहेत.

मुंबई, सुरत, केरळ येथून तब्बल 22 हजार लोक गंजामला आले असले, तरी ते सगळे सुरक्षित आहेत. या सगळ्यांची दिवसातून एकदा हजेरी घेतली जात आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. "होम क्वारंटाईन' केलेल्या लोकांच्या घरांच्या दरवाजांना स्टिकर लावली आहेत. कुलांगे यांनी महिलांची मदत मोठ्या खुबीने घेतली आहे. बचतगटांच्या महिलांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले. रोज त्यांना सूचना देऊन घरात त्याची अंमलबजावणी करून घेतली.

लोकांचा विश्‍वास संपादन केला 
याबाबत कुलांगे म्हणाले, ""गंजाम जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे. त्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना घराबाहेर न पडण्याचे महत्त्व पटवून दिले. सायकलवर जाऊन आपुलकीने विचारपूस केली. कुटुंबातीलच कुणी तरी आपल्याशी बोलतेय, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते अजून भक्कमपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रवृत्त होत असल्याचा अनुभव आहे.'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख