गंगापूरमध्ये आमदार भाजपचे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयाला 64 हजार मते  !

चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेला हर्षवर्धन जाधव यांचा एक मराठा लाख मराठा पॅटर्न चालला तर प्रशांत बंब यांची अडचण होऊ शकते .
Jadhav-Bamb-Danve
Jadhav-Bamb-Danve

गंगापूरमध्ये आता विधानसभेलाही एक मराठा लाख मराठा ? 

औरंगाबादः लोकसभा निवडणुकीत कायम शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघ यावेळी मात्र पिछाडीवर पडला आहे.गंगापूरमध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब  आहेत . त्यांच्या मतदार संघात  शिवसेनेऐवेजी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव यांना तब्ब्ल  64 हजार मते पडली आणि चार हजार मतांची लीडही मिळाली !

विधानसभेला पंचरंगी लढतीत प्रशांत बंब 17 हजार 289 मतांच्या लीडने  आमदार झाले होते . पण लोकसभेला शिवसेना - भाजप युती असूनही खैरे चार हजार मतांनी पिछाडीवर राहिले . आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेला हर्षवर्धन जाधव यांचा एक मराठा लाख मराठा पॅटर्न चालला तर प्रशांत बंब  यांची अडचण होऊ शकते . एम आय एम ला गंगापूर खुलताबाद मतदारसंघात पडलेली 56 हजार मते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंता वाढविणारी ठरणार आहेत . 


 विशेष म्हणजे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेच्या खैरे यांना हा धक्का समजला जातो. या मतदारसंघातून एकदा अपक्ष आणि गेल्यावेळी भाजपकडून निवडून  आलेल्या प्रशांत बंब यांच्यासाठी देखील शिवसेनेचे घटते मताधिक्‍य चिंतेचा विषय म्हणावा लागेल. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सलग पाचवा विजय मिळवण्याचे शिवसेनेचे स्वप्न अवघ्या साडेचार हजार मतांनी भंगले. ज्या ग्रामीण भागावर आतापर्यंत शिवसेनेच्या विजयाची मदार कायम राहिली, त्यावर या निवडणुकीत एक मराठा लाख मराठा असा नारा देणारे  अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी यंदा  कब्जा केला.

महायुतीचे उमेदवार म्हणून गंगापूर-खुल्ताबदचे विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब यांनी खैरेंच्या प्रचारासाठी तालुक्‍यात अनेक भागात पदयात्रा काढून सभा घेतल्या होत्या. परंतु एमआयएम-वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी बंब यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

1999 ते 2014 अशी सलग चार टर्म  गंगापूर विधानसभा मतदारसंघातून 2009 चा अपवाद वगळता शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना मताधिक्‍य मिळाले होते. शिवसेनेचे आमदार अण्णासाहेब माने आमदार असतांना खैरे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या विरोधात 8 हजार 967 मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपचे आमदार प्रशांत बंब असतांना खैरे यांच्यापेक्षा 4 हजार 311 अधिकची मते घेऊन त्यांना मागे टाकले. 

गंगापूरमधून खैरे यांना 60 हजार 082, जाधव यांना 64 हजार 393, झांबड यांना 12 हजार 781, तर विजयी इम्तियाज जलील यांना 56 हजार 023 एवढी मते मिळाली आहेत. आतापर्यंतच्या पाच लोकसभा निवडणुकीत खैरे यांना 99 मध्ये कॉंग्रेस उमेदवार ए. आर. अंतुले यांच्या विरोधात 44 हजार 306, रामकृष्णबाबा पाटील यांच्या विरोधात 2004 मध्ये 23 हजार 614, कॉंग्रेसच्याच नितीन पाटील यांच्या विरोधात 2014 मध्ये 10 हजार 652 मतांची आघाडी मिळाली होती. 2019 मध्ये मात्र अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी या आघाडीला ब्रेक लावण्याचे काम केले. 

विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात युतीधर्म न पाळता जावयाला मदत केल्याचा आरोप केला असतांना हे घडले आहे. भाजपच्या नगरसेवकासंह काही पदाधिकाऱ्यांवर नाव घेऊन आरोप करणाऱ्या खैरे यांनी प्रशांत बंब यांना मात्र क्‍लीनचीट दिली होती.

परंतु प्रत्यक्षात मतमोजणी होऊन बंब यांच्या मतदारसंघातून देखील खैरे पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता बंब यांनी खरंच शिवसेनेचे काम केले? की युतीला हात दाखवला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com