Gangapur Maratha Kranti Morcha Nashik | Sarkarnama

#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी गंगापूर धरणात उतरुन आंदोलन 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला शहराच्या विविध भागात बंदला प्रतिसाद मिळाले. कार्यकर्ते शहरात पंचवटी कारंजा, सातपुर, भद्रकाली, नाशिक रोड, विहितगाव, देवळाली कॅम्प भागात कार्यकर्ते जमले होते. त्यांनी बाजारपेठेत बंदचे आवाहन केले. यावेळी नाशिक रोडला काही भागात घोषणा देत काही दुकानांची नाशिक रोड परिसरात तोडफोड केली.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कडकडीत बंद पुकारण्यात आला. यावेळी कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी घोषणा देत बंदचे आवाहन करीत होते. जिल्ह्याच्या विविध भागात बंदला प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी शहरात गंगापुर धरणात उतरुन आंदोलन केले. बंदचा बससेवेवर परिणाम झाल्याने पोलिस बंदोबस्तात बसेस सोडल्या जात होत्या. 

मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला शहराच्या विविध भागात बंदला प्रतिसाद मिळाले. कार्यकर्ते शहरात पंचवटी कारंजा, सातपुर, भद्रकाली, नाशिक रोड, विहितगाव, देवळाली कॅम्प भागात कार्यकर्ते जमले होते. त्यांनी बाजारपेठेत बंदचे आवाहन केले. यावेळी नाशिक रोडला काही भागात घोषणा देत काही दुकानांची नाशिक रोड परिसरात तोडफोड केली. बसेसवर दगडफेक झाल्याने तोडफोड झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याचा दैनंदीन व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झाला. बाजारपेठा बंद राहिल्या. 

त्यानंतर काही आंदोलक गंगापुर धरणाच्या पाण्यात भगवे ध्वज घेऊन उतरले. त्यामुळे पोलिसांनी शहरात बंदोबस्त तैनात केला होता. फिरती पोलिस पथके गस्त घालत होते. त्यांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या बंदचा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर परिणाम झाला. ठक्कर बझार बस स्थानकातुन महत्वाच्या मार्गावर पोलिस बंदोबस्तात बसेस सोडल्या जात होत्या. बससेवा संथ झाल्याने अनेक प्रवाशी नाशिक रोड, ठक्कर बझार येथे अडकुन पडले. 

राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. त्याचे पडसाद नाशिक शहरात उमटु नये यासाठी पोलिस दक्षता घेत होते. शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प असली तरी नाशिक शहर बाहेर जाणारी बस सेवा तुरळक प्रमाणात सुरू होती. शहरात काल झालेल्या हिंसाचारात आतपर्यंत आठ बसेस फोडण्यात आल्या. परिवहन महामंडळाने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या पार्शवभूमीवर सकाळ पासून धुळे, पुणे आणि मुंबई कडे जाणाऱ्या बसेसला पोलीस संरक्षण दिले होते. औरंगाबादकडे जाणारी बससेवा बंदच ठेवण्यात आली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख