गुट्टे यांच्या अंगावर 134 दिवसानंतर पडणार विजयाचा गुलाल ...

गुट्टे यांच्या अंगावर 134 दिवसानंतर पडणार विजयाचा गुलाल ...

परभणी : शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणारे गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच्य न्यायालयाने गुरुवारी (दि. 5) जामीन मंजूर केला. आमदार गुट्टे हे मागील 346 दिवसापासून न्यायालयीन कोठडीत होते.  त्यांनी कोठडीतूनच 2019 ची विधानसभा निवडणूक लढवून विजय संपादन केला आहे. तेव्हापासून ते तुरुंगातच होते.

गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने 2017 मध्ये 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. सहा बॅंकांकडून बनावट कागदपत्राच्या आधारे हे कर्ज प्रकरणे मंजूर करून घेण्यात आली होती. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन हा मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या चार जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. यानंतर पाच राष्ट्रीयकृत बॅंका ज्यात आंध्रा बॅंक, युको बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, सिंडिकेट बॅंक तर मुंबईच्या रत्नाकर बॅंकेकडून तब्बल 328 कोटीची रक्कम परस्पर उचलली. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर ऊस पुरवला, त्यायाबाबत बॅंकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली, तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणी रासप नेते डॉ. रत्नाकर गुट्टे याच्यावर दि. 5 जुलै 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी 2019 रोजी गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंह पडवळ यांना अटक करण्यात आली होती. औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड, डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करुन गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात हजर करुन या प्रकरणाचे दोषरोपपत्रही दाखल केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तब्बल 346 दिवसाची न्यायालयीन कोठडी भोगल्यानंतर गुरुवारी (ता.पाच) सर्वोच्य न्यायालयाने आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना जामीन मंजूर केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com