नाईकांच्या मनोमिलनासाठी बैठकांचे सत्र सुरू 

: गणेश नाईक कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सूत जुळवून घेण्यासाठी नाईक कुटुंबियांतर्फे बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. या बैठकीत खुद्द गणेश नाईक हे उपस्थित राहत असून सोबतीला माजी महापौर सागर नाईक व माजी खासदार संजीव नाईकांसह आजी-माजी नगरसेवकही असतात.
Ganesh Naik
Ganesh Naik

नवी मुंबई  : गणेश नाईक कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सूत जुळवून घेण्यासाठी नाईक कुटुंबियांतर्फे बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. या बैठकीत खुद्द गणेश नाईक हे उपस्थित राहत असून सोबतीला माजी महापौर सागर नाईक व माजी खासदार संजीव नाईकांसह आजी-माजी नगरसेवकही असतात. 

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई क्रिडा संकूलात भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक संपन्न झाली होती. मात्र, त्या बैठकीला भाजपच्या वरिष्ठांची परवानगी नसल्याने पुन्हा नव्याने वाद होऊ नयेत म्हणून परवानगी घेऊन नाईकांकडून बैठका आयोजित केल्या जात आहेत. गणेश नाईकांभोवती फिरणारी नवी मुंबईची राजकीय समीकरणे मागील काही वर्षांमध्ये बदलली आहेत. केंद्रात दोनवेळा आणि राज्यात एकवेळा भाजप सरकार आल्यापासून नवी मुंबईतील सत्ताकेंद्रे बदलली आहेत. राष्ट्रवादीतून नाईकांचे अनेक खंदे समर्थकांनी वेग-वेगळ्या चुली मांडल्यामुळे ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात वेग-वेगळी बलस्थाने उभी राहत आहेत. 

ही बलस्थाने डोईजड होण्याची परिस्थिती असतानाच माजी आमदार संदीप नाईक आणि गणेश नाईकांनी पक्षांतर करून पुन्हा समीकरणे आपल्याभोवती फिरण्यास सुरूवात केली आहेत. राजकारणात फारकाळ कोणी शत्रु आणि मित्र नसतो या म्हणी प्रमाणे एकेकाळचा पक्का विरोधकच पक्षात आल्यामुळे भाजपमधील विस्थापितांची चलबिचल सुरू झाली आहे. परंतु, या हालचालींना हवा मिळून चळवळ होऊ नयेत त्याकरीता नाईकांकडून खबरदारी म्हणून भाजपच्या जून्या आणि सतत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन बैठका घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. नाईकांकरीता बेलापूर मतदार संघात विविध ठिकाणी नाईक समर्थक नगरसेवकांच्या माध्यमातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी या बैठकांचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रवादीप्रमाणे भाजपमध्येही जनाधार वाढवण्यासाठी या बैठका घेतल्या जात असल्याचे नाईक समर्थकांकडून सांगितले जात आहे. 

गणेश नाईक भाजपमध्ये आल्यानंतर आता सर्व मनमुटाव दूर झाले आहेत. परंतु, पक्षाची भविष्यातील धोरणे निश्‍चित करणे, वरिष्ठांनी पक्षाचा आखून दिलेला कार्यक्रमावर अंमलबजावणी करणे, पक्षांच्या वरिष्ठांनी आखून दिलेले कार्यक्रम व योजना राबवण्याकरीता जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. 
- रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com