Ganesh_Naik_
Ganesh_Naik_

गणेश नाईकांचा करिष्मा कायम, युतीच्या नमो पॅनेलचा धुव्वा उडवला. 

..

नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा करिष्मा नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणूकीनिमित्ताने पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना पाहायला मिळाला आहे.
 नवी मुंबईतील पहिले क्रिडा संकूल असा नावलौकिक असलेल्या एनएमएसएच्या कार्यकारणी निवडणूकीत नाईक समर्थक डॉ. दिलीप राणे पॅनेलने युतीच्या नेत्यांच्या नमो पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला. 

उपाध्यक्षासहीत इतर कार्यकारणी सदस्य अशा एकूण 12 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत नमो पॅनेलला एकही जागा निवडून आणता आली नाही. या निवडणूकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या दोघांनाही धुळ चारल्याने नाईक पुन्हा एकदा जायंट किलर ठरले आहेत. 

तब्बल 36 वर्षांपूर्वी वाशी येथे स्थापन झालेल्या नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन हे नवी मुंबईतील सर्वात जूने क्रिडा संकूल आहे. गणेश नाईक या संकूलाचे अध्यक्ष असून गेली अनेक वर्षे त्यांच्या अधिपत्याखाली या संकूलाचा कारभार चालवला जातो. 

कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे उपाध्यक्ष, खजिनदार व सरचिटणीस यांचसहीत सदस्य असे एकूण 12 जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. परंतू या निवडणूकीत पहिल्यांदाच नाईकांच्या पॅनेलसमोर युतीच्या नवी मुंबईतील तगड्या नेत्यांनी कंबर कसल्यामुळे नाईकांना कडवे आव्हान दिले होते. 

तसेच नाईक भाजपप्रवेशाच्या मार्गावर असल्यामुळे या निवडणूकीतील विजय-पराजय त्यांच्या प्रवेशावर परीणाम करण्याचा काही भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. 

त्यामुळे क्रिडा संकूलातील गैरव्यवहार, मर्जीतील लोकांना कंत्राटांचे वाटप, अंतर्गत कुरघोडी चव्हाट्या आल्या होत्या. नमो पॅनेलकडून राणे पॅनेलची उणीधुणी काढण्यात आली होती.

परंतू तरी देखील एनएमएसएच्या मतदारांनी राणे पॅनेलला पसंती दर्शवून नमो पॅनेलच्या नेत्यांना हादरा दिला आहे. या निवडणूकीत राणे पॅनेलचे 12 पैकी 11 जण बहुमताने निवडून आले आहेत. तर अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या शिल्पा केनिया या निवडून आल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com