गणेश नाईकांनी आता कॉंग्रेसचे पाच नगरसेवक फोडून भाजपत आणले 

महापालिकेतील कॉंग्रेसचे प्राबल्य दहावरून पाचवर आले आहे.हे पाच नगरसेवक भाजपचे काम करणार1. नगरसेविका फशीबाई भगत2. नगरसेविका वैजयंतीभगत3. नगरसेविका रूपाली भगत4. नगरसेविका हेमांगी सोनावणे5. नगरसेविका अंजली वाळूंज
Ganesh_Naik
Ganesh_Naik

नवी मुंबई,: माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपाठोपाठ आता कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनीही कुटुंबीयांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. भगत यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक अंकुश सोनावणे आणि कॉंग्रेसचे वाशी तालुका अध्यक्ष विजय वाळूंज यांचाही प्रवेश झाला. 


या प्रवेशामुळे भगत यांच्या वहिनी नगरसेविका फशीबाई भगत, पत्नी नगरसेविका वयजंती भगत आणि सून नगरसेविका रूपाली भगत, अंकुश सोनावणे यांच्या पत्नी नगरसेविका हेमांगी सोनावणे आणि वाळूंज यांच्या प्रवेशामुळे नगरसेविका अंजली वाळूंज हे पाच नगरसेवक आता भाजपसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेतील कॉंग्रेसचे प्राबल्य दहावरून पाचवर आले आहे.

नवी मुंबई शहरात नाईक कुटुंबीयांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये जोरदार प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. काही वर्षांपासून नाईकांच्या निकट झालेल्या दशरथ भगत यांनीही अखेर कॉंग्रेसला रामराम केला आहे. भगत यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमधील पाच नगरसेवकांची संख्या कमी होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते व माजी जिल्हाध्यक्ष पदे भोगल्यानंतर भगत यांनी आपण कॉंग्रेसला दिलेली 30 वर्षे वाया गेल्याची टीका केली. 

नवी मुंबईच्या विकासासाठी फक्त एकमेव गणेश नाईक यांनाच श्रेय जाते. हेच खरे शिल्पकार असल्याचे कौतुकोद्‌गार भगत यांनी काढले. यापुढे आता भाजपमध्ये काम करणार असल्याने आपल्या भूमिका बदलल्या असल्याचे भगत यांनी सांगितले.

भाजपचे नवी मुंबई निरीक्षक आणि प्रदेश सचिव संजय उपाध्याय व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा वाशी येथे रंगला. या प्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशांत भगत यांचा आणि एनएसआययूच्या शकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com