गणेश नाईक - गोपाळ लांडगेंचा पराभव करणाऱ्या  ' नोटा'चा प्रभाव वाढतोय !

मतदान पत्रिकेवरील उमेदवारांपैकी कोणालाही मतदान करायचे नसल्यास वरील पैकी कोणीही नाही ( none of the above ) नोटा चा पर्याय निवडणूक आयोगाने मतदारांना खुला केला . त्याचे चांगले वाईट परिणाम अनेक उमेदवारांना भोगावे लागले . काही मोठ्या व तंगड्या उमेदवाराचा पराभव जितक्या मतांनी झाला त्यापेक्षा नोटाला तेथे जास्त मतदान झाल्याचे आढळून आले आहे . अशा या पराक्रमी नोटांचा प्रभाव २०१९ च्या निवडणुकीतही राहणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे .
Naik-Landge-&-Nota.
Naik-Landge-&-Nota.

कल्याण :  गेल्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच उपलब्ध केलेल्या "नोटा'च्या पर्यायाबाबत पुरेशी जनजागृती झाल्याचे दिसून येते. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात "नोटा'चा प्रभावीपणे पर्याय निवडला गेला. त्यावरून ग्रामीण भागातही "नोटा'ला पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भिवंडी पूर्व आणि पश्‍चिम विधानसभा क्षेत्रात या पर्यायाचा सर्वांत कमी वापर केला गेला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात कमीत कमी 50, तर जास्तीत जास्त 125 नागरिकांनी ' नोटा' पर्याय निवडून उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक उमेदवारांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे 'नोटा' पर्याय पराभूत उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आणि सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदींचा पराभव "नोटा'मुळे झाल्याचे उघड झाले होते. 

मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातून 1491 मतांनी विजयी झाल्या. येथे "नोटा'ला 1944 लोकांनी पसंती दर्शविली. कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड हे 745 मतांनी विजयी झाले. येथून 2720 लोकांनी "नोटा'ला पसंती दिली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सुमारे 43 हजार 85 मतदारांनी नकाराच्या अधिकाराचा वापर केला. हे प्रमाण मतदान केलेल्या मतदारांच्या तुलनेत 1.43 टक्के इतके असले, तरी या पर्यायाचा वापर करण्याची संधी अनेक लोक घेत आहे, हे नक्की.


2014 साली लोकसभा मतदारसंघात झालेली 'नोटा'ची नोंदणी

पालघर - 21,797 (2.20 टक्‍के)
पालघर पोटनिवडणूक 2018 - 16,884 (1.90 टक्‍के)
ठाणे- 13,174 (1.25 टक्‍के)
भिवंडी - 9,311 (1.06 टक्‍के)
कल्याण - 9,185 (1.11 टक्‍के)
---------------------------

विविध पालिकांमधील गत निवडणुकीतील नोटांची संख्या
कल्याण-डोंबिवली - 12,049
मुंबई - 87,719
ठाणे - 81,888
भिवंडी - 19 हजार
------------------------

विधानसभा निहाय नोटांची आकडेवारी (सन 2014)

कल्याण (प) - 1838 
ठाणे - 2194
कल्याण (पू) -2720 
कळवा मुंब्रा -1685
डोंबिवली - 2013 
बेलापूर -1944
कल्याण ग्रामीण - 7835 
ऐरोली - 1697
कोपरी पाचपाखाडी - 2565 
ओवळा माजिवडा - 2390
मिरा-भाईंदर - 2378
 उल्हासनगर - 1308
अंबरनाथ - 2288 
मुरबाड - 3394
भिवंडी पूर्व- 612 
भिवंडी (प) - 799

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com