ganesh naik | Sarkarnama

भिवंडीत धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे : गणेश नाईक

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

भिवंडी, ता. 27 : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे गरजेचं असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले. ते भिवंडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलत होते. 

भिवंडी, ता. 27 : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे गरजेचं असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले. ते भिवंडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलत होते. 

समद नगर भिवंडी येथे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हसनैन फारुकी, मनसेचे शहर पदाधिकारी हमीद शेख, कॉंग्रेस पदाधिकारी ऍडव्होकेट सगीर मोमीन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांच्या सोबत बोललो असून यापुढे पक्षाची सुकाणू समिती धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर बोलणी करणार आहे. त्यातून सकारात्मक निर्णय व्हावा या साठी मी एक पाऊल मागे येण्यास तयार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हि भूमिका घेतोय म्हणजे पक्षाला कोणी कमी लेखू नये असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले, भाजपा स्मार्ट सिटीचा धिंडोरा पिटत आहे. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली नवीमुंबई स्मार्टसिटी पेक्षा एक पाऊल पुढे स्मार्टनेस सिटी झाली आहे. भिवंडी शहरातसुद्धा पक्ष विकासाचे मॉडेल राबवू इच्छिते त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी खंबीर पणे निवडणुकीला सामोरे जावे यश नक्की मिळेल असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख