आजचा वाढदिवस : गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आणि खासदार  - gajanan kirtikar | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आणि खासदार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे नेते आणि खासदार आहेत. कॉंग्रेसचे नेते गुरूदास कामत यांचा 2014 च्या निवडणुकीत त्यांनी पराभव केला आहे. खासदार होण्यापूर्वी ते मालाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. येथून ते 1990 मध्ये पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर 1995, 1999, 2004 असे सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. 1995 ते 1998 काळात ते गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री राहिले. त्यानंतर 1998 ते 99 मध्ये नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात राज्याचे परिवहन मंत्रीही होते. किर्तीकर यांनी पक्षातही मोठ्या पदावर काम केले.

गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे नेते आणि खासदार आहेत. कॉंग्रेसचे नेते गुरूदास कामत यांचा 2014 च्या निवडणुकीत त्यांनी पराभव केला आहे. खासदार होण्यापूर्वी ते मालाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. येथून ते 1990 मध्ये पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर 1995, 1999, 2004 असे सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. 1995 ते 1998 काळात ते गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री राहिले. त्यानंतर 1998 ते 99 मध्ये नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात राज्याचे परिवहन मंत्रीही होते. किर्तीकर यांनी पक्षातही मोठ्या पदावर काम केले. ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्थानिक लोकाधिकार समितीत काम केले. मराठी मुलांना नोकऱ्या देण्यात समितीने नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्यावर पक्षांने त्यांच्यावर पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुखपदाचीही जबाबदारी टाकली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख