आजचा वाढदिवस : गजानन बाबर, माजी खासदार, मावळ, पुणे. - gajanan babar shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : गजानन बाबर, माजी खासदार, मावळ, पुणे.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

गजानन बाबर हे मावळचे माजी खासदार आहेत. नवनिर्मित मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार असा बहुमान त्यांच्याकडे आहे. पाणीवाले बाबर म्हणून त्यावेळी ते ओळखले जात होते. गेली 30 वर्षे पिंपरी- चिंचवडमधील राजकारणात ते आहेत. ते तीनदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर राज्यात सर्वांत मोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2014 मध्ये पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच ते शिवसेनेतून बाहेर पडले. ते मनसेत गेले. मात्र, तेथूनही अल्पावधीत बाहेर पडत ते भाजपमध्ये दाखल झाले. सध्या पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात ते सक्रिय नाहीत.

गजानन बाबर हे मावळचे माजी खासदार आहेत. नवनिर्मित मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार असा बहुमान त्यांच्याकडे आहे. पाणीवाले बाबर म्हणून त्यावेळी ते ओळखले जात होते. गेली 30 वर्षे पिंपरी- चिंचवडमधील राजकारणात ते आहेत. ते तीनदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर राज्यात सर्वांत मोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2014 मध्ये पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच ते शिवसेनेतून बाहेर पडले. ते मनसेत गेले. मात्र, तेथूनही अल्पावधीत बाहेर पडत ते भाजपमध्ये दाखल झाले. सध्या पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात ते सक्रिय नाहीत. सध्या गावाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भुईंज (जि.सातारा) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. पिंपरी-चिंचवडमधील गजानन लोकसेवा बॅंकेचे आणि रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख