gahininath thore press | Sarkarnama

जयंत पाटलांना हाताशी धरून पंकजा मुंडेंनी ऊस कामगारांचा संप मोडला!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

राज्यभर स्थलांतरीत झालेले साधारण पंधरा लाख लोक गावी येतील.  

नगर : "मजुरांना कष्टाच्या तुलनेत मजुरी मिळत नाही. शौचालय, घरे, विमा आदी प्रश्‍न कायम आहेत. चार वर्षात त्यासाठी संप पुकारला. मात्र सरकारने फारसी दखल घेतली नाही. कराराच्या नावाखाली ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांना हाताशी धरुन दोन वेळा संप मोडून काढला, मजुरांची फसवणूक केली. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने संपाला धार आली नाही. मात्र मजुरांच्या हक्कासाठी लढताना त्यांना न्याय मिळण्याची भावना त्यांनी ठेवली नाही,'' अशी खंत महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

थोरे म्हणाले, दुष्काळी भागातील अनेक कुटूंबे गाव सोडून ऊसतोडणीसाठी गेलेली आहेत. यंदा हंगाम लवकरच संपणार असून साधारण दोन महिन्यात मजुर पुन्हा गावी येतील. त्यावेळी जनावरांसाठी व लोकांसाठी उपाययोजना करताना प्रशासनाची धावपळ उडणार आहे. त्यामुळे आताच प्रशासनाने ऊसतोडणी कामगारांच्या गावांत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

ते म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरे जगवण्याची चिंता आणि रोजगाराचा प्रश्‍न यामुळे राज्यात यंदा ऊसतोडणी कामगारांची संख्या वाढली आहे. बीड, नगरसह राज्यातील दुष्काळी भागातील लोक रोजगार, जनावरे जगवण्यासाठी ऊसतोढणीला गेले आहेत. आताच बहूतांश गावांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्‍न गंभीर आहे. सध्या मजुर स्थलांतरीत झाले असल्याने अजून तीव्रता दिसत नाही. यंदा साखर साखर कारखान्याचा हंगाम साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये संपणार आहे. त्यानंतर राज्यभर स्थलांतरीत झालेले साधारण पंधरा लाख लोक गावी येतील.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख