अर्धांगिनीच्या साक्षीने गडकरींनी स्वीकारला पदभार

नवी दिल्लीच्या उद्योग भवनमध्ये नितीन गडकरी यांनी आज अर्धांगिनी कांचन गडकरी यांच्या साक्षीने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री पदाचा पदभार स्विकारला.
अर्धांगिनीच्या साक्षीने गडकरींनी स्वीकारला पदभार

नागपूर : नवी दिल्लीच्या उद्योग भवनमध्ये नितीन गडकरी यांनी आज अर्धांगिनी कांचन गडकरी यांच्या साक्षीने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री पदाचा पदभार स्विकारला. 

आयुष्याच्या वाटचालीत उद्योग, शेती आणि राजकारणाच्या लहानमोठ्या चढउतारात सदैव सोबत असलेल्या सौ. कांचन
यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारताना भविष्यातील करावयाच्या कामांची जबाबदारी त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होती. 

रस्ते वाहतूक मंत्रालयात उत्कृष्ठ कामगीरी करुन संपूर्ण देशवासीयांसह विरोधकांचीसुद्धा वाहवा मिळविणाऱ्या गडकरी यांच्यासोबत पत्नी कांचन यांच्या पाठबळाची उर्जा आहे. या उर्जेतूनच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी अविरत धडपड केली आणि आजही करताहेत.

केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना नितीन गडकरी देशभर फिरत असतात. त्यांचा फारच कमी वेळ नागपूरच्या वाट्याला येतो. अशा वेळीही नागपुरातील त्यांच्या भक्ती बंगल्यावर कार्यकर्ते आणि नागरीकांची वर्दळ कधीही थांबत नाही, ती अविरत सुरुच असते आणि कार्यकर्ते म्हणजे त्यांचा परिवार आहे. अशा वेळी
त्यांच्या अनुपस्थितीत आपला परिवार सांभाळण्यासह कार्यकर्त्यांचा नागपुरातीलच नव्हे तर राज्यभर पसरलेला परीवार सांभाळण्याची जबाबदारी कांचनताईंवर असते. 

भक्ती बंगल्यावर आलेल्या प्रत्येकाची त्या मायेने, आस्थेने विचारपुस करतात. त्यांची कामे मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न
करतात. विशेष म्हणजे भक्ती बंगल्यावर आलेला कुणीही बिना खानपान करता कधीच परत जात नाही. कारण कांचनताई ही सर्व व्यवस्था जातीने बघतात. त्यामुळे नितीन गडकरी बिनधास्त होऊन देशभर कार्य करु शकतात. कांचनताईंमुळे नितीनजींचा कार्यकर्ता परिवार दिवसागणिक वाढला आणि वाढतच आहे. नितीनजींच्या यशामध्ये कांचनताईंच्या भक्कम पाठबळाचा सिंहाचा वाटा आहे. 

लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचे त्यांनी आज अर्धांगीनीच्या साक्षीने देशाला सांगितले. येत्या पाच वर्षात ते लघुउद्योग क्षेत्राचा कायापालट करतील, हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com