Gadkari says, it is not yet time | Sarkarnama

गडकरी म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाही 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने पुन्हा विचार करावा आणि सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मुंबई : अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने पुन्हा विचार करावा आणि सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी स्थापन होईल का? याबाबत बोलताना श्री. गडकरी म्हणाले, " सत्तेसाठी आघाडी झाली
तर ती अनैसर्गिक ठरेल. अशी अनैसर्गिक आघाडी झाली तरी फार काळ टिकत नसते असा अनुभव आहे. याउलट भाजप - शिवसेना युती
ही हिंदुत्वाच्या धाग्यात बांधली गेली आहे. देशात सर्वाधिक काळ ही युती टिकली आहे. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याशी सत्तेसाठी
शिवसेना आघाडी करणार नाही,`` असे मला वाटते. 

कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती तोडायची हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. 

अमित शहांनी मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतेही आश्‍वासन दिले नव्हते, असे सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले, लोकसभा
निवडणुकीची युतीची बोलणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि सर्व सत्तापदे 50 : 50 टक्के वाटून घेण्याची मागणी केली. त्यावर अमित शहा म्हणाले, सध्या याबाबत चर्चा नको. विधानसभेच्या वेळी याबाबत चर्चा करू. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख